शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थाही स्वीकारताहेत दोन हजाराच्या नोटा; कुठलीही अट नाही

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 7, 2023 14:42 IST

या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

नागपूर : दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतल्यानंतर पतसंस्थांनी या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्य पतसंस्था फेडरेशनच्या आवाहनानंतर आता पतसंस्थाही दोन हजाराच्या नोटा स्वीकारत आहेत. मात्र, बँकांप्रमाणे या नोटांची अदलाबदल करण्याचे अधिकार पतसंस्थांना नाहीत.

आरबीआयच्या निर्णयानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी फेसबुक लाईव्ह करीत राज्यातील जवळपास १६ हजार पतसंस्थांना दोन हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही नागपुरातील काही पतसंस्थांनी दोन हजाराच्या नोटा रोखीने स्वीकारण्यास नकार दिला होता. अनेकांनी आरबीआयच्या नियमावलीत स्पष्टता नसल्याचे कारण दिले होते. सरकार भारतीचे पदाधिकारी विवेक जुगादे यांनीही पतसंस्थांना दोन हजाराच्या नोटा स्वीकारण्यात काहीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

पतसंस्थांमध्ये दोन लाखांपर्यंत रोख स्वीकारली जाते. यात दोन हजाराच्या नोटांचाही समावेश आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे पतसंस्थांनी कोणताही संभ्रम न ठेवता दोन हजाराच्या नोटा स्वीकाराव्यात. याकरिता रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे आणि आयकर खात्याच्या अटी पाळाव्यात, असे आवाहन विवेक जुगादे यांनी केले आहे

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर