क्रेडाई नागपूर मेट्रोच्या अध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:41+5:302021-04-05T04:07:41+5:30
- दोन वर्षांची कार्यकारिणी जाहीर : शासनाने मुद्रांक शुल्क कपात तीन महिने वाढवावी नागपूर : क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन ...

क्रेडाई नागपूर मेट्रोच्या अध्यक्षपदी
- दोन वर्षांची कार्यकारिणी जाहीर : शासनाने मुद्रांक शुल्क कपात तीन महिने वाढवावी
नागपूर : क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विजय दर्गन, सचिव गौरव अगरवाला आणि कोषाध्यक्षपदी राजमोहन शाहू यांची निवड झाली. वर्ष २०२१-२३ करिता नवीन कार्यकारिणीची घोषणा प्रशांत सरोदे यांनी केली. मावळते अध्यक्ष महेश साधवानी यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष आशिष लोंदे, एकलव्य वासेकर, जेठानंद खंडवानी, चंद्रशेखर सुने, सहसचिव तारक चावला, अभिषेक जवेरी, प्रतीश गुजराती, विजय जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजेश बजाज, सिद्धार्थ सराफ, रवींद्र कापसे, नरेश बरडे, नितीन डांगोरे, विनोद कुबडे, विश्वास गुप्ता, राहुल पिसे, भरत धापोडकर, हेमंत मदने, नीलेश खाडे, नितीन पाटील, रौनक दिवटे यांचा समावेश आहे. गौरव अगरवाला म्हणाले, क्रेडाई आपल्या कार्याने प्रशासनात चांगली प्रतिमा बनविण्यात यशस्वी ठरली आहे. सरकार आणि घर खरेदीदारांमध्ये सेतूच्या स्वरुपात क्रेडाई काम करीत आहे.
अध्यक्ष विजय दर्गन यांनी सल्लागार सदस्य संतदास चावला, प्रशांत सरोदे, सुनील दुद्दलवार, अनिल नायर, शिशिर दिवटे यांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले आणि भविष्यातही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून प्रलंबित यूडीसीपीआर शासनाने जारी केला, पण त्यात अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. यात स्पष्टीकरणे येण्यासाठी चमू कार्यरत आहे. व्यवसायाशी संबंधित हा मुद्दा सोडविण्याचे प्रयत्न आहे. त्याचा फायदा बिल्डरांना होणार आहे. सामान्य माणसांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यांना दर्जेदार आणि परवडणारी घरे देण्यासाठी परिश्रम घेऊ. सरकारने मुद्रांक शुल्क कपातीची मुदत किमान तीन महिने वाढवावी.