शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 9:18 PM

तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देआचार्य लोकेश मुनीजी : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत धर्मातील सामाजिक शांती व समता या विषयावर ते बोलत होते. आचार्य लोकेश मुनी म्हणाले, मोक्षाचा मार्ग सांगणारे अनेक आहेत. पण मुक्तीचा मार्ग दाखवणारे जीवनच सार्थक आहे. विश्वशांतीच्या पूर्वी मनाची शांती महत्त्वाची आहे. व्यक्ती शांतीचा शोधासाठी मंदिर, हिमालयात जाऊन येतात. आता तर अंतरिक्षामध्येही घर बांधण्यासाठी प्लॉटचे बुकिंग केले जात आहे. हे सर्व शांततेच्या शोधासाठी सुरू आहे. परंतु कुणीही आपल्या मनात ती शोधत नाही. आपले मन शांत नसेल तर व्यक्ती शांत राहूच शकत नाही. त्यामुळे मनाची शांती हीच सर्वात महत्त्वाची आहे. तथागत गौतम बुद्धाने नेमका हाच संदेश दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दीक्षाभूमीवरून जगात जावा शांतीचा संदेश - अब्दुल फलाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवरून बुद्धाचा शांती व करुणेचा संदेश पुनर्जिवित केला, त्या दीक्षाभूमीवरून तो जगभरात पोहाचावा, असे आवाहन मुस्लीम समजाचे विचारवंत अब्दुल फलाही यांनी केले. इस्लाम याचा अर्थ शांती होय. इस्लाम धर्म हा शांतीचा धर्म आहे. परंतु समाजात काही असमाजिक तत्त्व असे आहेत. जे समाजात कटुता निर्माण करतात. त्यांना रोखून शांतीचा संदेश पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जगभरातील बौद्ध विचारवंतांनी मांडली समतेची संकल्पनापरिषदेच्या एका सत्रात जगभरातील बौद्ध विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची संकल्पना विषद करीत तथागत गौतम बुद्धांचा धम्म समजावून सांगितला. थायलंडच्या डॉ. सिरीकोतन मनिरीन, राजकुमारी मारिया अमोर, राकुमारी सिसोवॉट, गगन मलीक यांच्यासह महाबोधी सोसायटी श्रीलंकेचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, बांग्लादेश येथील भंते बानाश्री महाथेरा संघनायका आदींनी समतेची संकल्पना विषद केली. तसेच थायलंड कंबोडिया येथील कलावंतांनी आपापल्या देशातील कलाही सादर केली.उद्या परिषदेतसकाळी ७ वाजता बुद्ध वंदनासकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर मानवीय अधिकारांचे पुरस्कर्ते व आधुनिक भारताचे शिल्पकार यावर खा. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान.सकाळी १०.१५ वाजता म्यानमार येथील कलावंतांचे नृत्य सादरीकरणसकाळी १०.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शनदुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमदुपारी २ वाजता पाली तथा जागतिक भाषांमधील बौद्ध धम्माचे मानवतावादी तत्त्वज्ञानदुपारी ४ वाजता बौद्ध राष्ट्रांच्या प्रगतीत बुद्ध धम्माचे योगदान यावर मार्गदर्शनसायंकाळी ७.३० वाजता अहिंसक अंगुलीमाल नाटक (दीक्षाभूमीवर)   

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वnagpurनागपूर