पूर्वेत विकासाचा इतिहास घडविणार

By Admin | Updated: October 12, 2014 01:18 IST2014-10-12T01:18:49+5:302014-10-12T01:18:49+5:30

गेली २५ वर्षे पिछाडीवर असलेले पूर्व नागपूर खोपडे यांच्या प्रयत्नाने अवघ्या ५ वर्षात विकासाच्या श्रेणीत आले. भविष्यात या मतदार संघात विकासाचा इतिहास घडविणार, असा दावा भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री

To create a history of development in East Bengal | पूर्वेत विकासाचा इतिहास घडविणार

पूर्वेत विकासाचा इतिहास घडविणार

नितीन गडकरी : पूर्व नागपुरात जाहीर सभा
नागपूर : गेली २५ वर्षे पिछाडीवर असलेले पूर्व नागपूर खोपडे यांच्या प्रयत्नाने अवघ्या ५ वर्षात विकासाच्या श्रेणीत आले. भविष्यात या मतदार संघात विकासाचा इतिहास घडविणार, असा दावा भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नागपूर येथील जाहीर सभेत केला.
पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूर्व नागपुरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. पारडी ब्रिज, आर.टी.ओ, स्वतंत्र रेशनिंग झोन, झोपडपट्ट्यांना पट्टे वाटपाकरिता प्लेन टेबल सर्वे, एन.डी.झेड, यु.एल.सी व अन्य आरक्षण वगळणे, वाठोडा, पारडी सारख्या आऊटर भागात करोडोची मूलभूत विकासकामे खोपडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. नगरसेवक असताना पासून ते जनतेच्या संपर्कात होते.
भविष्यात आणखी विकासकामे करण्यास ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. दरम्यान भांडेवाडी, वाठोडा, पारडी, सतनामीनगर, लकडगंज, बस्तरवारी, शांतीनगर, डिप्टी सिग्नल, मिनीमातानगर, भारतनगर या भागात खोपडे यांनी प्रचार रॅली काढून जनसंपर्क साधला. या रॅलीत त्यांच्यासोबत बाल्या बोरकर, देवेंद्र मेहर, प्रवीण नरड, प्रदीप पोहाणे, अनिल धावडे, मनिषा कोठे, अनिता वानखेडे, कांता रारोकर, संगीता कळमकर, सुलोचना कोवे, रामदास गुडधे, चेतना टांक, महेंद्र राऊत, रवींद्र डोळस, हरीश डिकोंडवार, पांडुरंग मेहर, गंगाधर लेंडे, आसिफ कलीवाला, राजू साकोरे, अशोक डिकोंडवार, चंद्रशेखर पिल्ले, सुनील कोठे, अजित कौशल, मुरलीधर नागपुरे, मेघराज मैनानी, सतनामसिंग सोखी, गजानन अंतुरकर, राजू गाडगे, श्रीकांत रारोकर, नाना पडोळे, बाबराव चंगोले आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: To create a history of development in East Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.