भाकप रामटेकसह चार जागा लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:05 IST2019-03-09T23:04:13+5:302019-03-09T23:05:47+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असून पक्षाने रामटेकसह शिर्डी, परभणी व गडचिरोली येथील लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाकप रामटेकसह चार जागा लढवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असून पक्षाने रामटेकसह शिर्डी, परभणी व गडचिरोली येथील लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने आदेश दिल्यास रामटेक लोकसभा लढण्याची तयारी केली जाईल, असा प्रस्ताव भाकपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी मोहनदास नायडू होते. तर बैठकीला पी.के. गोतमारे, बी.एन.जे. शर्मा, सुधाकर वाघुळे, शाम काळे, अरुण वनकर, रमेश किचारे, मधुकर मानकर, संजय राऊत, करुणा साखरे, युगल रायलू, चंद्रशेखर मौर्य, रमेश जयसिंगपुरे आदी उपस्थित होते.