मनपा केंद्रामध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST2021-08-17T04:13:18+5:302021-08-17T04:13:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे आज मंगळवारी १८ वर्षांवरील नागरिकांचे ...

Covishield available today at the Municipal Center | मनपा केंद्रामध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

मनपा केंद्रामध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे आज मंगळवारी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह सरकारी केंद्रावर होणार आहे. या केंद्रावर कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

नागरिकांना पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

तसेच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके महाल रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल, दिघोरी येथे उपलब्ध आहे.

Web Title: Covishield available today at the Municipal Center