मनपा केंद्रावर आज कोविशिल्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST2021-07-23T04:07:33+5:302021-07-23T04:07:33+5:30

नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे आज शुक्रवारी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण ...

Covishield available today at the Municipal Center | मनपा केंद्रावर आज कोविशिल्ड उपलब्ध

मनपा केंद्रावर आज कोविशिल्ड उपलब्ध

नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे आज शुक्रवारी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह शासकीय केंद्रावर होणार आहे. नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत केले जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या मनपा आणि अन्य सरकारी केंद्रांवर कोविशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे, त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरही १८ वर्षावरील लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होईल.

Web Title: Covishield available today at the Municipal Center