२३ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:29+5:302021-04-20T04:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता २३ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात ...

Covid Care Center in 23 hotels | २३ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर

२३ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता २३ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिली.

पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना संसर्गीत रुग्णांसाठी आतापर्यंत ८१२८ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ३१ रुग्णालयांमध्ये २०३ साधारण बेड, १२४७ ऑक्सिजन बेड तर ८८ व्हेंटिलेटर बेड व कोविड केयर सेंटरमध्ये ५१३ बेडसह एकूण १७९२ बेड उपलब्ध आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ४०१४ बेड आहेत. मेयो, मेडिकल, एम्समध्ये १८०० बेड आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ४० हजार ६५ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. १०० बेड क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांट मेयो व मेडिकलमध्ये स्थापित होईल. हा प्लांट हवेतून ऑक्सिजनचा उपयोग करेल. शहरात २५० व ग्रामीण भागात ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व २०० व्हेंटिलेटर दोन आठवड्यात उपलब्ध होईल. तसेच आरटीपीसीआरचा रिपोर्ट ३० मिनिटात देणारे क्रिस्पर फेलुदा मशीनसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

नि:शुल्क अंत्यसंस्कार

पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, कोविडमुळे मृत झालेल्या लोकांचे अंत्यसंस्कार नि:शुल्क करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत, तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकलमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थी व नर्सींग स्टाफची मदत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Covid Care Center in 23 hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.