शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपीला तुरुंगात चांगली वागणूक देण्याचा दावा; वकिलाला न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:45 IST

Nagpur : वकिली हा महान व्यवसाय असून, त्याची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे आद्यकर्तव्य आहे. वकिलांकडून अत्यंत प्रामाणिकपणा आणि निष्ठा अपेक्षित आहे. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा प्रयत्न करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वकिली हा महान व्यवसाय असून, त्याची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे आद्यकर्तव्य आहे. वकिलांकडून अत्यंत प्रामाणिकपणा आणि निष्ठा अपेक्षित आहे. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी पक्षकारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम कायदेशीर प्रयत्न करायला हवेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अॅड. सचिन वानखेडे यांनी त्यांच्याविरोधातील लाचलुचपत एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाला त्यांचे कृत्य वकिली व्यवसायाच्या तत्त्वांना अनुरूप नसल्याचे आढळून आले. न्यायालयाने वकील व वकिली व्यवसायावर महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करून ही याचिका फेटाळून लावली. वकिली एक महान व आव्हानात्मक व्यवसाय आहे. वकील न्यायालयाचे अधिकारी असतात. त्यांना सन्माननीय सदस्य म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्यांनी हा दर्जा सांभाळून वागले पाहिजे. पक्षकारांच्या अधिकारांचे प्रामाणिकपणे संरक्षण केले पाहिजे. वाद सोडविण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले पाहिजे. वकिलांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्या सुटतील, अशी भावना पक्षकारांमध्ये निर्माण झाली पाहिजे. वकिलांमुळे त्यांच्या समस्या वाढायला नको, असेही न्यायालय निर्णयात म्हणाले.

..असे आहे प्रकरण : 

मूर्तिजापूर पोलिसांनी तक्रारकर्ते राजेश कांबे यांच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यामुळे कांबे यांनी अॅड. वानखेडे यांची सेवा घेतली होती. दरम्यान, वानखेडे यांनी मुलाला पोलिस ठाण्यात चांगली वागणूक मिळवून देण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Court rebukes lawyer for promising special treatment to rape accused.

Web Summary : The High Court criticized a lawyer for allegedly demanding money to ensure favorable treatment for a rape accused in jail. The court emphasized lawyers' ethical duty to serve clients honestly and uphold the profession's integrity, rejecting the lawyer's petition to quash bribery charges.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय