- राकेश घानोडेनागपूर : लग्न करण्याचे खोटे वचन देऊन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच होय. अशा प्रकरणात मुलीने स्वेच्छेने संबंध ठेवले असे म्हणता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाचे न्या. मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.शरीरसंबंधाच्या वेळी मुलगी २१ वर्षे वयाची होती. ती सज्ञान होती. तिने स्वेच्छेने शरीर संबंध ठेवले होते. त्यामुळे तरुणाला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करता येणार नाही, असा युक्तिवाद उच्च न्यायालयात करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने मुलीची तक्रार लक्षात घेता तो युक्तिवाद फेटाळून लावला. आरोपी तरुणाने मुलीला लग्नाचे खोटे वचन दिले होते. मुलीने त्या वचनाला बळी पडून तरुणासोबत शरीरसंबंध ठेवले होते.
लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध हा बलात्कारच - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 05:52 IST