रोस्टर घोटाळ्यात न्यायालयाची दिशाभूल

By Admin | Published: January 28, 2015 01:06 AM2015-01-28T01:06:28+5:302015-01-28T01:06:28+5:30

सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्याशी संबंधित सत्य माहिती लपवून न्यायालयाची दिशाभूल केली असा याचिकाकर्ते सुनील मिश्रा यांचा आरोप आहे.

The court is misinterpreted in the roster racket | रोस्टर घोटाळ्यात न्यायालयाची दिशाभूल

रोस्टर घोटाळ्यात न्यायालयाची दिशाभूल

googlenewsNext

याचिकाकर्त्याचा आरोप : पोलिसांच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर
नागपूर : सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्याशी संबंधित सत्य माहिती लपवून न्यायालयाची दिशाभूल केली असा याचिकाकर्ते सुनील मिश्रा यांचा आरोप आहे. त्यांनी पोलिसांच्या उत्तराला प्रत्युत्तर देणारे प्रतिज्ञापत्र मंगळवारी न्यायालयात दाखल केले.
रोस्टर घोटाळ्याच्या आरोपात तथ्य आढळून आल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रकरणाची खुली चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. लोणे समितीच्या अहवालानंतर विधिमंडळ अधिवेशनात घोटाळ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिवांनी प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून ३ सप्टेंबर २०११ रोजी आरोपींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, ही माहिती पोलिसांनी न्यायालयापासून लपवून ठेवली. आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मिश्रा यांनी नमूद केले आहे.
मिश्रा यांची याप्रकरणाशी संबंधित फौजदारी रिट याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. यात पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करून रोस्टर घोटाळ्याच्या चौकशीशी पोलिसांचा काहीच संबंध नसून विद्यापीठाने प्रकरणाची चौकशी करावी, असे स्पष्टीकरण दिले होते. २००२ ते २००८ या कालावधीत राखीव प्रवर्गातील ५०६ नियुक्त्यांमध्ये झालेला गैरप्रकार ‘रोस्टर घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. (प्रतिनिधी)

Web Title: The court is misinterpreted in the roster racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.