शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

न्यायालयाने दिला न्याय, आता परीक्षा सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:33 AM

गोवारी हे आदिवासीच असल्याचे शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने नुकतेच केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी लढणाऱ्या गोवारी समाजाला अखेर न्यायालयाने न्याय दिला आहे. आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे. कारण सरकार जोपर्यंत शासन निर्णय (जीआर) काढणार नाही, तोपर्यंत गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती मिळणार नाहीत. त्यामुळे शासनाने तातडीने जीआर काढावा, अशी मागणी गोवारी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. गोवारी समाजाची हक्काची लढाई अजूनही सुरूच राहणार असून शासनाची आता खऱ्या अर्थाने परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्देगोवारी समाज : सरकारने तातडीने जीआर काढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवारी हे आदिवासीच असल्याचे शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने नुकतेच केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी लढणाऱ्या गोवारी समाजाला अखेर न्यायालयाने न्याय दिला आहे. आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे. कारण सरकार जोपर्यंत शासन निर्णय (जीआर) काढणार नाही, तोपर्यंत गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती मिळणार नाहीत. त्यामुळे शासनाने तातडीने जीआर काढावा, अशी मागणी गोवारी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. गोवारी समाजाची हक्काची लढाई अजूनही सुरूच राहणार असून शासनाची आता खऱ्या अर्थाने परीक्षा होणार आहे.आदिवासी गोवारी जमात सेवा समितीचे प्रभुदास काळसर्पे यांनी सांगितले की, न्यायालयाने गोवारी समाजाची सत्याची बाजू मान्य केली. आता राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. शासन जीआर काढेल तेव्हाच गोवारी समाजाला खºया अर्थाने आदिवासींच्या सवलती मिळू शकतील. तोपर्यंत ही लढाई संपलेली नाही. ती आम्हाला लढावीच लागणार आहे.आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांचे म्हणणे आहे की, शासनाने आता ताबडतोब जीआर काढायला हवा. शासनाने आजवर धूळफेकच केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शासन कोणती भूमिका घेते, यावर शासनाच्या मनात आणि पोटात काय आहे, हेही दिसून येईल.आदिवासी गोवारी समाज विद्यार्थी युवक संघ कृती समितीचे संयोजक रामनाथ काळसर्पे यांनी सांगितले की, सन १९५० व १९५६ मध्ये अनुसूचित जमातीच यादी तयार करताना १९३१ च्या जातीनिहाय जनगणना रिपोर्टमध्ये असलेल्या जाती आणि भारत सरकार कायदा १९३५ मध्ये मगासवर्गीय जात भारतीय प्रांतामध्ये वर्णित केलेल्या यादीच्या आधारावर बनवलेली आहे. त्यामध्ये गोंडगोवारी अशा नावाने जमातीची नोंद नाही. असे असताना स्वत:ची नोकरी वाचवण्याकरिता राजकीय दबावाखाली काही अधिकाºयांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून चुकीची माहिती देऊन गोवारी समाजाला २३ वर्षांपासून आदिवासी सवलतीपासून वंचित ठेवले आणि समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक नुकसान केले. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना आता चपराक बसली आहे. एकूणच न्यायालयाने समाजाला न्याय दिला पण आता शासनाच्या भूमिकेकडे गोवारी समाजाचे लक्ष लागले आहे.अंमलबजावणी होईल याची शंकाउच्च न्यायालयच्या निर्णयामुळे आनंद आहे. गोवारी समाजाच्या बाजूने पहिल्यांदा कुठलीरी यंत्रणा बोलली. परंतु शासन न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल की नाही, याबाबत मात्र शंका आहे. कारण गोवारी समाजासारखाच माना समाजाचाही प्रश्न होतो. न्यायालयाने त्यांच्याबाबतही असाच निर्णय वेळोवेळी दिला, परंतु जात पडताळणीच्या नावावर त्यांचे हक्क डावलले जात आहे. त्यामुळे न्यायालयाने निर्णय दिला असला तरी शासनाकडून ते सहजासहजी मिळणार नाही. त्यामुळे गोवारी समाजाला त्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आंदोलन तीव्र करावे लागेल.रमेश गजबेमाना समाजाचे नेतेशासनाने अपिलात जाऊ नयेगोवारी समाजाने आपल्या हक्कासाठी ११४ लोकांची आहुती दिली आहे. न्यायासाठी चार पिढ्या गारद झाल्या. हा समाज अतिशय मागासलेला आहे. ही बाब शासनाने व इतर समाजबांधवांनीही समजून घ्यावी. शासन खरेच गोवारी समाजासोबत असेल तर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये. कैलास राऊतअध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटनागोवारींचे समर्थनच; पण, संविधानाची चौकट कायम राहावीगोवारी समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी आहे आणि तो मागासलेला आहे. त्यामुळे आदिवासी म्हणून आम्ही त्यांचे समर्थनच करतो. परंतु अनुसूचित जातीचे आरक्षण ठरविण्याचा सर्वोच्च अधिकार हा घटनेनुसार केवळ संसदेला आहे. तो न्यायालयाला नाही. त्यामुळे संविधानिक चौकटीत राहूनच हा निर्णय व्हावा. उद्या न्यायालयाचा आधार घेऊन अनुसूचित जमातीमध्ये कुणाचाही समावेश होऊ शकतो. भविष्यात ते धोकादायक ठरू शकते. म्हणून यासंदर्भात ठोस काय भूमिका घेता येईल, यासाठी येत्या १९ तारखेला विविध आदिवासी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात संघटनेची पुढची दिशा ठरवण्यात येईल. दिनेश शेरामअध्यक्ष, अ.भा. आदिवासी विकास परिषद नागपूरगोवारी समाज हा आदिवासीचगोवारी समाज हा आदिवासीच आहे. त्यांची संस्कृती ही सारखीच आहे. ते आदिवासीमध्येच असायला हवे, अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. गोवारी समाजाने आता जास्तीत जास्त आरक्षण मिळावे, अशी मागणी करायला हवी. कृष्णराव परतेतीप्रदेश सचिव, अ.भा. आदिवासी विकास परिषदकेवळ राजकीय स्वार्थापोटी आदिवासी सवलतीपासून वंचित ठेवलेगोवारी समाजाला केवळ राजकीय स्वार्थापोटी आदिवासी सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले. सन १९५० व १९५६ मध्ये अनुसूचित जमातीची यादी तयार करताना १९३१ च्या जातीनिहाय जनगणना रिपोर्टमध्ये असलेल्या जाती आणि भारत सरकार कायदा १९३५ मध्ये मागासवर्गीय जात भारतीय प्रातांमध्ये वर्णित केलेल्या यादीच्या आधरावर बनवलेली आहे. त्यामध्ये गोंडगोवारी या नावाने जातीची नोंद नाही. तर गोवारी या जातीची नोंद आहे. असे असताना स्वत:ची नोकरी वाचवण्याकरिता राजकीय दबावाखाली काही अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष करून २४ एप्रिल १९८५ च्या जीआरमध्ये गोंडगोवारी जमात आहे, अशी चुकीची माहिती देऊन २३ वर्षांपासून गोवारी समाजाला आदिवासी सवलतीपासून वंचित ठेवून समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक नुकसान केले. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना चपराक बसली आहे. रामनाथ काळसर्पेसंयोजक, आदिवासी गोवारी समाज विद्यार्थी युवक संघ कृती समिती

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीGovernmentसरकार