शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

देशाचा मोदींवर विश्वास, तेच पुढील पंतप्रधान : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:50 IST

‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान होतील. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ‘पोस्टर’च्या अनावरणप्रसंगी ते त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

ठळक मुद्दे‘एक्झिट पोल’ निकालांचे निर्देशकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान होतील. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ‘पोस्टर’च्या अनावरणप्रसंगी ते त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंह, अभिनेता विवेक ओबेरॉय हे प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींमुळे जगभरात देशाचा लौकिक वाढला आहे. देशाला सगळीकडे मानसन्मान मिळतो आहे. ५० वर्षात झाला नाही तेवढा विकास पाच वर्षांत झाला. देशाने विकासाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त सरकार अनुभवले. यंदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’ला २०१४ च्या तुलनेत अधिक जागा मिळतील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. मला कुठले मंत्रिपद मिळेल याचा सर्वस्वी निर्णय पंतप्रधान घेतील, असेदेखील गडकरी यांनी स्पष्ट केले.शहजादे, अब होगा न्याय !मागील पाच वर्षांत भारत बदलला आहे. देशात घराणेशाहीचे दिवस ओसरले असून आता वडिलांचे नाव नव्हे व्यक्तीचे काम चालेल. २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर खऱ्या अर्थाने शहजादे, अब होगा न्याय, या शब्दांत विवेक ओबेरॉयने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोन्ही कर्मठ नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व हीच त्यांची ओळख आहे. चित्रपट जगताच्या भाषेत सांगायचे झाल्यास मोदी आणि गडकरी हे ‘अ‍ॅक्शन हिरो’ आहेत. जे लोक ‘कमिशन’ खाण्यासाठी कुख्यात आहेत, त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे आणले, असा आरोपदेखील विवेक ओबेरॉयने केला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकता नसल्याची खंतदेखील त्याने बोलून दाखविली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरीexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९