सौर ऊर्जेतूनच देश स्वयंपूर्ण
By Admin | Updated: February 2, 2015 01:10 IST2015-02-02T01:10:28+5:302015-02-02T01:10:28+5:30
खनिज संपत्ती, सौरऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग योग्य तऱ्हेने केला तर अनेक ऊर्जास्रोत आपल्या देशात उपलब्ध आहेत. या स्रोतांवर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्माण केली

सौर ऊर्जेतूनच देश स्वयंपूर्ण
अमर्यादित ऊर्जेतून प्रगती विषयावर परिसंवाद : मान्यवरांचा सूर
नागपूर : खनिज संपत्ती, सौरऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग योग्य तऱ्हेने केला तर अनेक ऊर्जास्रोत आपल्या देशात उपलब्ध आहेत. या स्रोतांवर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्माण केली तर आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरजच नाही. पण या पारंपरिक ऊर्जेकडे आपले अद्यापही लक्ष गेले नाही. नैसर्गिक स्रोतांची आपण उपेक्षाच केली, त्यामुळे एकीकडे आपण मंगळावर पोहोचलो असलो तरी, ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कमी पडलो. निसर्गातून मिळणाऱ्या ऊर्जेचा अभ्यास न केला गेल्याने यासंदर्भात मोठे संशोधन उभे राहण्याची गरज आहे. प्रामुख्याने सौरऊर्जेचा उपयोग आपण विविध कारणांसाठी करू शकतो, कारण प्रत्येक उद्योगाला लागणारी वीज यातूनच निर्माण होते. हे पारंपरिक स्रोतच आपल्या देशाला स्वयंपूर्ण करू शकतात. यासाठी सौरऊर्जेचा उपयोग, उपकरणांची निर्मिती, त्यांचा आकार याबाबत नव्या संशोधकांना आणि उद्योजकांना भरपूर संधी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
ंथर्मल पॉवरचे दुष्परिणाम मोठे आहेत. सौरऊर्जेने ते पूर्ण संपतील. पण सौरऊर्जेची उपकरणे संशोधनातून आकाराने लहान करून ही ऊर्जा स्टोअर करून ठेवण्याची सोय करावी लागेल. सौरऊर्जेच्या उपयोगातून सोसायटी, शेतकरी, अपार्टमेंट यांना वीज विकून व्यवसाय उभारणी करता येते, असे मत उमेंद्र वाटोळकर यांनी व्यक्त केले.
ंग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक होतो. रोज २० सिगारेट ओढल्याने होणारा परिणाम चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होतो. या धुरापासून वाचण्यासाठी मी सोलर कुकर तयार केला. त्याचा लाभ होतो आहे. गरजा ओळखून संशोधन आणि व्यवसाय करा, यश मिळेलच, असे आयआयटी पवईचे विवेक काब्रा म्हणाले.
ं सेवा क्षेत्रात अनेक संधी आहेत, पण आपण त्या ओळखत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे दुरुस्त करणे, बिल भरण्याची सेवा यातून मोठा उद्योग उभा राहतो, त्याची उदाहरणे आहेत. गरज ओळखा, सेवा द्या, व्यवसाय उभा होतो, असे मत निरंजन देशकर यांनी व्यक्त केले.
ंआपल्याला जे आवडते त्यात झोकून द्या. त्यासाठी जिद्द ठेवा, जरा डोळसपणे आजूबाजूला पाहा. व्यवसायात यश येते, असे मत अतुल मार्डीकर यांनी व्यक्त केले.