लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला पाकिस्तानचा धोका मुळीच नाही. बालाकोट एअर स्ट्राईकने पाकडे चित झाले आहेत. खरा धोका या देशातील हिंदूंच्या आत्मघातकी वृत्तीचा आहे. याची जाणीव स्वातंत्र्यवीरांनी खूप आधीच करवून दिली आहे, त्याचे स्मरण करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.सप्तक व ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने हर्षधन प्रॉडक्शन निर्मिती, प्रसिद्ध साहित्यिक सुमन फडके लिखित व जागेश्वर ढोबळे दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर’ या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, सावरकर बोलत होते. याप्रसंगी महापौर संदीप जोशी, स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण जोशी, एलआयसीचे माजी महाव्यवस्थापक नीलेश साठे, सप्तकचे विलास मानेकर, ऑरेंज सिटीचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.सावरकर विचार मेला तर हा देश संपेल, याचा विश्वास पाकिस्तानला आहे. त्याच षड्यंत्राची अंमलबजावणी काँग्रेस करत असल्याचा आरोपही सावरकर यांनी यावेळी केला. हिंदू म्हणून जोवर एकत्र येत नाही, तोवर त्याच षड्यंत्राला आपण बळी पडणार आहोत. यासाठी जाती-पाती-पंथ विसरून सर्वांनी एकत्र या. आपण एक झालो की नाईलजास्तव का होईल स्वार्थापोटी तरी काँग्रेसला हिंदुत्व स्वीकारावेच लागेल, असे रणजित सावरकर यावेळी म्हणाले. सीएए हा विशिष्ट धर्मासाठी नाही तर ते लोक जाळपोळ करत आहेत, हिंदूंनाच बाहेरचे म्हटले जात आहे, हा देश आमचा म्हणत आहेत. मग, जर हा देश त्यांचा तर आम्हा बहुसंख्यकांसोबत भावांसारखेच राहा अन्यथा आमच्या आक्रोशाचा सामना करा, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक लघुपटाचे संगीत दिग्दर्शक अभिजित जोशी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.शाळांमध्ये हा लघुपट दाखवू - संदीप जोशी स्वातंत्र्यवीरांचा हा इतिहास अत्यंत अल्प वेळेत आणि रंजक प्रकारात सादर झालेला आहे. त्यामुळे, हा लघुपट शाळा-शाळा, गल्लीबोळातील मुलांना दाखवू. त्यासाठी गट तयार करण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.
देशाला पाकचा नव्हे तर आपल्या आत्मघातकी वृत्तीचा धोका : रणजित सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:10 IST
आपल्या देशाला पाकिस्तानचा धोका मुळीच नाही. बालाकोट एअर स्ट्राईकने पाकडे चित झाले आहेत. खरा धोका या देशातील हिंदूंच्या आत्मघातकी वृत्तीचा आहे. याची जाणीव स्वातंत्र्यवीरांनी खूप आधीच करवून दिली आहे, त्याचे स्मरण करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.
देशाला पाकचा नव्हे तर आपल्या आत्मघातकी वृत्तीचा धोका : रणजित सावरकर
ठळक मुद्दे हा देश आपला मानत असाल तर भावासारखेच रहा! ‘स्वातंत्र्यवीर’ ध्वनिचित्रफितीचा लोकार्पण सोहळा