शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:01 IST

किराणा दुकानाच्या आड हातभट्टीद्वारे दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील अजनीच्या रहाटेनगर टोलीमध्ये छापा : महिला आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किराणा दुकानाच्या आड हातभट्टीद्वारे दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी रहाटेनगर टोली येथे छापा मारून कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेली महिला परिसरात किराणा दुकान चालवित होती. त्या आड दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री करीत होती. तिच्याकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. आरोपी ४५ वर्षीय पुष्पा अशोक प्रसाद आहे.पुष्पाचे रहाटेनगर टोली येथे किराणा दुकान आहे. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद आहे. अवैध दारूच्या अड्ड्याचा स्टॉक संपला आहे. काही ठिकाणी दुप्पट किमतीमध्ये दारू विकली जात आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टीमध्ये हातभट्टीची दारू विक्री होत आहे. टोली परिसरातसुद्धा चोरून लपून हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू आहे. लॉकडाऊन असतानाही किराणा दुकान सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या दुकानातून पुष्पा दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेला गुळ व नवसागरची विक्री करीत होती. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस कंट्रोल रुमला दिली. त्या आधारे अजनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. तिच्या दुकानातून ४००० किलो गुळ व ४५ किलो नवसागर मिळाले. दुकानातून पोलिसांनी ३० हजार रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. अजनी पोलिसांनी या प्रकरणी तपास उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविला आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध दारू विकली जात आहे. नकली दारूच्या सेवनाने अनेकांनी जीव देखील गमाविला आहे.दारूची दुकाने बंद असल्याने दारुडे अस्वस्थ आहे. नशेसाठी काहीपण करण्याची त्यांची मानसिकता झाली आहे. अशात नकली दारुमुळे मोठी घटना घडू शकते. तीन दिवसांपूर्वी ‘होम डिलिव्हरी’ देण्याच्या नावावर आॅनलाईन फसवणूक करण्यात आली होती. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे, अजनीचे पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, गणेश जामदार, एन.टी. फड, भगवती ठाकूर, देवेंद्र नवघरे, आतिश राऊत, रितेश गोतमारे यांनी केली.काळ्या गुळापासून पशुखाद्य निर्मितीअवैधपणे दारू बनविण्यासाठी आणलेला काळा गुळ पशुखाद्य निर्मितीसाठी वापरला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनीच्या रहाटेनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा मारून ४२० किलो काळा गुळ आणि ४५ किलो नवसागर जप्त केला होता. हा जप्त माल हिंगणा येथील पशूखाद्य निर्मिती कंपनीला देण्यात आला आहे. एक्साईज विभाग आणि अजनी पोलीस यांनी गुरुवारी रात्री संयुक्तपणे कारवाई करीत स्थानिक पुष्पा अशोक प्रसाद हिच्या घरून संबंधित माल जप्त केला होता. लॉकडाउनमुळे सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारू बनविणारे सक्रिय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दारू बनविणाऱ्यांसाठी मध्य प्रदेशातून काळा गुळ मागविला जातो. हा गुळ जप्त केल्यानंतर त्याची साठवणूक करणे एक्साईज विभागासाठी कठीण असते. साठविलेला गुळ काही दिवसांनंतर पाणी व्हायला लागतो. खाद्यपदार्थ असल्याने त्याला फेकून देणे किंवा नष्ट करणे योग्य नाही. ही बाब लक्षात घेता एक्साईज विभागातर्फे पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या परवानाधारक कंपन्यांना या गुळाची विक्री केली जाते. यामुळे विभागालाही लाखोंचा महसूलही प्राप्त होत आहे. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच एम-२ परवानाप्राप्त कंपन्यांना हा गुळ देणे आवश्यक असते. हिंगणा आणि एमआयडीसी परिसरात अशा परवानाधारक कंपन्या असून एक्साईज विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा गुळ संबंधित कंपन्यांना सोपवितात.

 

टॅग्स :Policeपोलिसraidधाड