शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:45 IST

तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. नियमाक मंडळाच्या अध्यक्षासह सदस्य नागपुरात पोहचले आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नाट्यकर्मींची वर्दळ वाढली आहे.

ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या कार्यालयात वाढली धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. नियमाक मंडळाच्या अध्यक्षासह सदस्य नागपुरात पोहचले आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नाट्यकर्मींची वर्दळ वाढली आहे.नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगावर गुरुवारी सायंकाळी अशोक हांडे यांचा मंगलगाणी दंगलगाणी हा मराठमोळ्या संगीताचा कार्यक्रम होणार आहे. महापौर करंडकच्या माध्यमातून नाट्य संमेलनाचा एक माहौल तयार झाला आहे. शहरात महत्त्वाच्या चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी नाट्य संमेलनाचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आले आहे. शहरातील सर्व नाट्य संस्था, शिक्षण संस्था यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या नाट्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १ हजारावर प्रतिनिधी येणार आहे. नाट्य संमेलनासाठी खास रेल्वेची बोगी आरक्षित करण्यात आली आहे. त्यात मुंबईहून ११० कलावंत येणार आहे. ७० कलावंत विमानाने नागपुरात येणार आहे. नाट्य कलावंत व प्रतिनिधींची निवास व भोजन व्यवस्था शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक समितीत १ अध्यक्ष व १५ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना आपापली जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रंथदिंडीने होणार सुरुवातनाट्य संमेलनाच्या परिसराला राम गणेश गडकरी नाट्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. तर मुख्य रंगमंचाला पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच नाव देण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन होणार असून, त्यापूर्वी ३ वाजता नाट्यदिंडी निघणार आहे. सलग ६० तास चालणार संमेलन२२ फेब्रुवारीला सायंकाळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच संमेलनातील कार्यक्रमाला सुरुवात होणार असून २५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत नाट्यनगरीत सलग कार्यक्रम रंगणार आहेत. म्हणजेच दिवसरात्र कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. नागपूरकर व नाट्यकर्मींसाठी पर्वणी३५ वर्षानंतर हे नाट्य संमेलन नागपुरात होत आहे, हेच मुळी आकर्षण आहे. या संमेलनासाठी जे वातावरण तयार झाले आहे, त्यातून स्थानिक रंगकर्मींसाठी चांगली संधी आहे. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत एकांकिका, नाटक, परिसंवाद, खडा तमाशा आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाला केवळ दीड महिन्याचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही कमी जास्त झाले असले तरी, हा संमेलनाचा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखा प्रयत्नरत आहे.शेखर बेंद्रे, कार्यकारिणी सदस्य, नाट्य परिषद, मुंबई

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी