जेरबंद आरटी-१ गोरेवाड्याच्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 21:35 IST2020-10-28T21:33:22+5:302020-10-28T21:35:34+5:30
Man Eater RT-1 Tiger in Gorewada, Nagpur news चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-विरुर वन परिक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आरटी-१ या वाघाला जेरबंद केल्यानंतर आता गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जखमा

जेरबंद आरटी-१ गोरेवाड्याच्या पिंजऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-विरुर वन परिक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आरटी-१ या वाघाला जेरबंद केल्यानंतर आता गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्या आहेत. देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मध्य चांदा वन विभागांतर्गत असलेल्या राजुरा-विरुर वन परिक्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून या वाघाचा धुमाकूळ सुरू होता. नागरिकांवर हल्ले करून त्यांना ठार केल्यामुळे बराच जनक्षोभही सुरू होता. या वाघाला ठार करा किंवा पकडून दुसरीकडे न्या, अशी मागणी होत होती. त्याला पकडण्याचे बरेच प्रयत्नही फसले होते. अखेर मंगळवारी तो पिंजऱ्यात अडकला.
बुधवारी सकाळी ४ वाजता त्याला पिंजऱ्यात बंद करून गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले. येथे पशुचिकित्सकाच्या देखरेखीखाली त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. सुजित कोलगंथ, डॉश शालिनी एस. आणि डॉ. मयूर पावसे यांनी उपचार केले असता, त्याच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले. या जखमा नेमक्या कशाच्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.