लोकमत न्यूज नेटवर्ककुही/पचखेडी : कुही तालुक्यातील कुही-आंभोरा मार्गावरील चिपडी (ता. कुही) गावाजवळ असलेल्या कल्पना जिनिंगच्या आवारातील कापसाला गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आग आली. या आगीत कामगाराचा आठ वर्षीय बालक होरपळल्याने गंभीर जखमी झाला असून, किमान १५ हजार क्विंटल कापूस जळाल्याने ११ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रोहन सुरेश दुधवे (८) असे होरपळलेल्या बालकाचे नाव आहे. या जिनिंगमध्ये गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना सायंकाळी आवारातील कापसाने पेट घेतला. ही आग कापसाच्या ढिगापर्यंत पोहोचली आणि मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. कामगारांनी आवारातील अग्निशमन संयंत्र सुरू करीत रोहनला बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. बाहेर काढेपर्यंत तो होरपळला होता.
अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत आवारातील किमान १५ हजार क्विंटल जळून राख व निकामी झाल्याने या आगीत ११ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग मशीनपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे मशीन व रुईच्या गाठी तसेच आतील कापूस थोडक्यात बचावला. य आगीचे मूळ कारण मात्र कळू शकले नाही.
बालक गंभीर जखमी
रोहनचे वडील या जिनिंगमध्ये कामगार म्हणून काम करीत असल्याने तसेच ते कुटुंबीयांसह याच जिनिंगच्या परिसरात राहत असल्याने रोहन रोज या जिनिंगच्या आवारात व तेथील कापसाच्या ढिगावर खेळायचा. तो गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कापसाच्या ढिगावर खेळत असताना आग लागली. त्याला वेळीच बाहेर पडणे शक्य झाले नाही. इतरांनी त्याला बाहेर काढेपर्यंत तो होरपळला होता. वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
Web Summary : A fire at a ginning factory near Kuhi destroyed cotton worth ₹11.70 crore. An eight-year-old boy was seriously injured. Short circuit is suspected as the cause; machines were saved.
Web Summary : कुही के पास एक कपास जिनिंग फैक्ट्री में आग लगने से 11.70 करोड़ रुपये का कपास जलकर खाक हो गया। एक आठ वर्षीय बालक गंभीर रूप से घायल हो गया। शॉर्ट सर्किट से आग लगने का संदेह है; मशीनें बचा ली गईं।