शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार

By सुनील चरपे | Updated: August 9, 2024 13:08 IST

१६.३६ लाख हेक्टरची घट : तेलबियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ

सुनील चरपे -

नागपूर : मागील खरीप हंगामाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. तुलनेत साेयाबीनसह इतर तेलबिया, डाळवर्गीय पिके आणि भरडधान्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. देशात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून दर मात्र दबावात राहणार आहेत.

२ ऑगस्टपर्यंत देशभरात ९०४.६० लाख हेक्टरवर विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी डाळवर्गीय पिकांचे पेरणीक्षेत्र १०.९० लाख हेक्टर, भरडधान्याचे ५.२१ लाख हेक्टर, साेयाबीनचे ३.२६ लाख हेक्टर, तेलबियांचे ५.९० लाख हेक्टर, तर धानाचे क्षेत्र १३.९० लाख हेक्टरने वाढले आहे. मागील वर्षी १२५.२०० लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झा ली हाेती. यंदा ६ ऑगस्टपर्यंत १०८.८३७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. 

कापूस पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर) (६ ऑगस्टपर्यंत)nदेशातील १० प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र चार हजार ते ३.३० लाख हेक्टरने घटले आहे.

कुठे फायदा, तर कुठे फटकाअतिपाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील कापसाची अवस्था सध्यातरी वाईट आहे. खान्देश, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पिकांची अवस्था चांगली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भावामुळे पंजाब, हरयाण व राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र सरासरी ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नुकसान पातळी ७५ टक्के कमी आहे.  तिन्ही राज्यांमध्ये पिके चांगली असल्याने या राज्यांमधील कापूस सप्टेंबरमध्ये  येईल.- नवनीतसिंह सैनी, संस्थापक, इंडियन काॅटन इनसाइट्स, हरयाणा.

टॅग्स :cottonकापूसCropपीकFarmerशेतकरी