शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

कापूस आयात वाढली, दर मात्र 'एमएसपी'च्या आसपास राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:08 IST

यंदा पेरणी क्षेत्र ३.३५ टक्क्यांनी घटले : आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची आयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षापासून कापसाची उत्पादकता व उत्पादन घटत आहे. वाढता खर्च, बाजारात मिळणारा कमी दर व यातून होणारे आर्थिक नुकसान पाहता, कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. कापसाची वाढती आयात व जागतिक पातळीवर दबावात असलेले दर विचारात घेता, आगामी हंगामात कापसाचे दर 'एमएसपी'च्या आसपास स्थिरावण्याची शक्यता बळावली आहे.

१ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. देशात कापसाचा वापर व मागणी स्थिर असल्याने १ ऑक्टोबर ते ३१ मे या आठ महिन्यांच्या काळात कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. तुलनेत निर्यात मात्र १८ लाख गाठींवर मर्यादित राहिली. सन २०२४-२५ या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी ७,५२१ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली होती. वास्तवात बहुतांश शेतकऱ्यांना ६,८०० ते ७,२०० रुपयांदरम्यान कापूस विकावा लागला.

चालू हंगामासाठी कापसाची एमएसपी ८,११० रुपये जाहीर करण्यात आली आहे. सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर ५५,८०० ते ५६,५०० रुपये, तर लांब धाग्याच्या रुईचे दर ५६,६०० ते ५७,००० प्रतिखंडी असून, सरकीचे दर ३,६०० ते ४,५४० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याने कापसाला सरासरी ७,३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हेच दर आगामी तीन महिन्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, सरकीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रतिक्विंटल ७,२०० तर वाढल्यास ७,५०० रुपयांच्या आसपास दर मिळू शकतो. 

कापसाचे सरासरी दर व एमएसपी (रुपये/प्रतिक्विंटल)वर्ष                        दर                एमएसपी२०१९-२०             ५,३८७               ५,५५०२०२०-२१              ५,४३०              ५,८२५२०२१-२२              ८,९५८              ६०२५२०२२-२३              ७,७७६             ६,३८०२०२३-२४               ७,३५०            ७,०२०२०२४-२५              ७,२५२             ७,५२१

देश व कापसाची आयातब्राझील - ७.५० लाख गाठीअमेरिका - ५.२५ लाख गाठीऑस्ट्रेलिया - ५.०० लाख गाठीमाली - १.७९ लाख गाठीइजिप्त - ८३ हजार गाठी

कापसाची आयात व निर्यात (लाख गाठी)हंगाम               आयात                 निर्यात२०१९-२०           १५.५०                ४६.०४२०२०-२१           ११.०३                 ७७.५९२०२१-२२           २१.००                 ४३.००२०२२-२३           १४,००                ३०,००२०२३-२४           २२.००               २८.३६२०२४-२५           २७.००               १८,००

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीnagpurनागपूर