लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांसाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले. याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि सीसीआयने एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली. या काळात व्यापाऱ्यांनी ६६.०६ टक्के कापूस बाजारभावाने म्हणजेच एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी केल्याने देशातील कापूस उत्पादकांचे सरासरी २,२३३.३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ऑल इंडिया कॉटन ब्रोकर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यांत देशभरातील बाजारात एकूण १४७ लाख ३१ हजार ४४१ गाठी (२,५०,४३,४४९.७ क्विंटल) कापूस बाजारात आला. यातील ५० लाख गाठी (८५ लाख क्विंटल) कापूस सीसीआयने खरेदी केल्याने उर्वरित ९७ लाख ३१ हजार ४४१ गाठी (१,६५,४३,४४९.७क्विंटल) कापूस व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ६,४०० ते ७,१०० रुपये दराने खरेदी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल १,००० ते १,७०० रुपये कमी मिळाले.
आयात शुल्क रद्द केल्याने कापसाची आयात वाढली आणि देशातील शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने कापूस विकावा लागल्याने त्यांचे किमान १,६५४ कोटी ३४ लाख ४९ हजार ७०० रुपये, तर कमाल २,८१२ कोटी ३८ लाख ६४ हजार ४९० रुपयांचे म्हणजेच सरासरी २,२३३ कोटी ३६ लाख ५७ हजार ९५ रुपयांचे नुकसान केले आहे.
सीसीआयची ३३.९४ टक्के खरेदी
कापूस वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सीसीआयने देशभरात ३३.९४ टक्के कापूस खरेदी केला. सीसीआयने सुरुवातीला ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एमएसपीपेक्षा कमी म्हणजेच प्रतिक्विंटल ७,६०० ते ८,१०० रुपये दराने खरेदी केला.कापूस उत्पादकता व खरेदीची जिल्हानिहाय अट, ऑनलाइन नोंदणीची क्लिष्ट पद्धती आणि खरेदी केंद्र सुरू करण्यास केलेली दिरंगाई पाहता सीसीआय व सरकार एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यास फारसे नसल्याचे स्पष्ट झाले.
राज्यनिहाय कापूस आवक व खरेदी (गाठी)(१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५)राज्य एकूण आवक सीसीआय व्यापारी१) पंजाब १,१४,२४७ - -२) हरयाणा ४,६१,८७१ - -३) राजस्थान १४,९१,०७१ - -४) गुजरात २७,३५,८९४ १,९७,००० २५,३६,८९४५) महाराष्ट्र ३३,३५,२९४ ५,९१,००० २७,४४,२९४६) मध्य प्रदेश ९,०३,३८८ १,८३,००० ७,२०,३३८७) तेलंगणा २७,६६,१७६ २०,००,००० ७,६६,१७६८) आंध्र प्रदेश १०,६७,६४७ १,६१,००० ८,५४,६४७२) कर्नाटक १७,१५,२९४ ३,६३,००० १३,७९,२९४१०) तामिळनाडू ४,७६५ - -११) ओडिशा १,३१,०२९ ४४,००० ८७,०२९१२) इतर ४,७६५ - -
Web Summary : Cotton farmers faced huge losses as delayed CCI procurement and import duty cuts led to lower prices. Traders bought 66% of cotton below MSP, causing farmers to lose an average of ₹2,233 crore in three months.
Web Summary : सीसीआई की खरीद में देरी और आयात शुल्क में कटौती के कारण कपास किसानों को भारी नुकसान हुआ। व्यापारियों ने एमएसपी से कम कीमत पर 66% कपास खरीदा, जिससे किसानों को तीन महीनों में औसतन ₹2,233 करोड़ का नुकसान हुआ।