नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. १९ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवन आणि नागभवन येथे करण्यात आली आहे. मंत्र्यांना कॉटेज सुद्धा निश्चित करण्यात आले आहे.
अधिकारी स्तरावर रविभवनातील क्रमांक १ चे कॉटेज अन्न व प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. तर जलसंपदा (गोदावर व कृष्णा खोरे) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दोन क्रमांकाचे काॅटेज मिळणार आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना क्रमांक ५ चे कॉटेज निश्चित करण्यात आले. यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या निवास वितरणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते.
रविभवनातील निवासाची व्यवस्था
मंत्री - कॉटेज क्रमांकछगन भुजबळ - १राधाकृष्ण विखे पाटील - २हसन मुश्रीफ - ३चंद्रकांत पाटील - ५गिरीश महाजन - ७गणेश नाईक - ८गुलाब पाटील - १०चंद्रशेखर बावनकुळे - ११दादाजी भुसे - १२संजय राठोड - १३मंगलप्रसाद लोढा - १४उदय सामंत - १५जयकुमार रावल - १६पंकजा मुंडे - १७अतल सावे - २१अशोक उईक - २४शंभुराज देसाई - २५आशिष शेलार - २६दत्तात्रय भरणे - २७आदिती तटकरे - २८शिवेंद्रसिंह भोसले - ६माणिक कोकाटे - २९जयकुमार गोरे - ३०नागभवनमधील निवास व्यवस्था
नरहरी झिरवाळ - १संजय सावकारे - २संजय शिरसाट- ३प्रताप सरनाईक - ४भरत गोगावले - ५मकरंद जाधव - ६नितेश राणे - ७आकाश फुंडकर- ८बाबासाहेब पाटील - ९प्रकाश आबिटकर - १०आशिष जयस्वाल - ११माधुरी मिसाळ - १२पंकज भोयर - १३मेघना बोर्डिकर - १४इंद्रनील नाईक - १५योगेश कदम - १६
Web Summary : Nagpur's winter session preparations are underway. Ministers' accommodations at Ravibhavan and Nagbhavan are finalized. Bhujbal gets cottage number one, Vikhe-Patil number two. Final decision pending.
Web Summary : नागपुर में शीतकालीन सत्र की तैयारी जारी। रविभवन और नागभवन में मंत्रियों के आवास तय। भुजबल को पहला कॉटेज, विखे-पाटिल को दूसरा। अंतिम निर्णय बाकी।