नागपूर जिल्ह्यात संगीतमय कारंज्यासाठी लाखोंचा सल्लागार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:34 IST2017-11-11T12:30:51+5:302017-11-11T12:34:49+5:30
जि.प.चा सक्षम बांधकाम विभाग संगीतमय कारंजे व खेळाचे साहित्य बसविण्यासाठी लाखो रुपये खर्चून सल्लागाराची नियुक्ती करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात संगीतमय कारंज्यासाठी लाखोंचा सल्लागार ?
आॅनलाईन लोकमत
नागपूर : 
हिंगणा तालुक्यातील टाकळघाट तीर्थक्षेत्र येथे संगीतमय कारंजे, लहान मुलांचे खेळांचे मैदान, भिंत, फुटपाथ रस्ता तयार करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी ९९ लाख ७० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. यात १ कोटी ३० लाख रुपये संगीतमय कारंजावर खर्च करण्यात येणार आहे. तर खेळाचे मैदान करण्यासाठी ४५ लाख रुपये व फूटपाथ रस्त्यासाठी तब्बल २ कोटी २१ लाख खर्च करण्यात येणार आहे. हे बांधकाम करण्यासाठी वास्तुशास्त्रज्ञाची मदत घेण्यात आली असून त्याला १८ लाख ८५ हजार रुपये देण्यात येणार आहे. हे दर सल्लागारानुसार निश्चित करण्यात आले असून यासाठी संबंधित सल्लागारास लाखो रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष बाजारदरापेक्षा हा जास्त खर्च असल्याची चर्चा असून यात गैरव्यवहार असल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य जनतेकडून कराच्या माध्यमातून पैसा देण्यात येतो. विकास कामावर हा पैसा खर्च होणे अपेक्षित असताना वास्तुशास्त्रज्ञ, सल्लागारावर खर्च करून एकप्रकारे जनतेच्या पैशाची लूट असल्याचेच बोलल्या जात आहे. अशा अवाजवी खर्चावर वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.