अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईचा खर्च

By Admin | Updated: December 24, 2016 02:37 IST2016-12-24T02:37:10+5:302016-12-24T02:37:10+5:30

शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमण

The cost of action on the encroachment | अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईचा खर्च

अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईचा खर्च

नागपूर : शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पथक माघारी फिरले की, पुन्हा अतिक्रमण केले जाते. याला आळा घालण्यासाठी अतिक्रमण कारवाई करणाऱ्या पथकावर होणार खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव प्रवर्तन विभागाने मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे.
नागपूर शहरातील शिकस्त घरे, अवैध बांधकामे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे , फूटपाथ व शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या तक्रारी प्रवर्तन विभागाला प्राप्त होत असतात. त्यानुसार विभागाकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेच्या विविध झोन स्तरावर पथके गठित करण्यात आलेली आहेत. या पथकावर दररोज प्रत्येकी २० हजारांचा खर्च केला जातो. हा खर्च संबंधिताकडून वसूल केला जाणार आहे.ं महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात प्रवर्तन १ अधीक्षक, १ स्थावर अधिकारी, ५ सहायक ,१ कनिष्ठ लिपीक, ३ हवालदार, १ सुतार, तसेच गॅगमन, ऐवजदार व मजूर अशा ४० जणांचे एक पथक असते. (प्रतिनिधी)

अतिक्रमणाला आळा
४महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाव्दारे शहरातील अतिक्रमणे हटविली जातात. परंतु कारवाईनंतर काही तासातच अतिक्रमण पूर्ववत होते. याला आळा बसावा, यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईचा खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अतिक्रमणाला आळा बसण्याची अपेक्षा आहे.

Web Title: The cost of action on the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.