संवादिनी निर्माते मनोहर गायकवाड यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:08 AM2021-06-17T00:08:57+5:302021-06-17T00:11:00+5:30

Manohar Gaikwad देशभरातील ख्यातनाम गायक ज्यांच्या संवादिनीच्या प्रेमात पडले होते, ते ख्यातनाम संवादिनी निर्माते मनोहर रामचंद्रराव गायकवाड यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले.

Correspondent Manohar Gaikwad passes away | संवादिनी निर्माते मनोहर गायकवाड यांचे निधन 

संवादिनी निर्माते मनोहर गायकवाड यांचे निधन 

googlenewsNext
ठळक मुद्देपायपेटीसाठी होते जगप्रसिद्ध : इंग्रज पडले होते मधू पियानोच्या प्रेमात बडे गुलाम अली खाँ, पं. भीमसेन जोशी, पं. किशन महाराजांसारखे दिग्गज गायकवाड यांच्याकडून मागवत संवादिनी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशभरातील ख्यातनाम गायक ज्यांच्या संवादिनीच्या प्रेमात पडले होते, ते ख्यातनाम संवादिनी निर्माते मनोहर रामचंद्रराव गायकवाड यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी उषा, चार मुले, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

देशभरात गायकवाड ब्रदर्स हे नाव संवादिनी (हार्मोनियम) निर्मितीत आदराने घेतले जात होते. त्यांनी तयार केलेली संवादिनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून ते पं. भीमसेन जोशी, पं. किशन महाराज यांच्याशी त्यांचा कौटुंबिक स्नेह होता. पहिल्यांदा नागपुरात आल्यानंतर लता मंगेशकर यांनी गायकवाड यांची आवर्जून भेट घेतली होती. व्ही. शांतारामसारखे दिग्गज त्यांच्याकडे येत असत. स्वरांचा अभ्यास, तबल्याची बनावट, तबल्यावर शाई कशा तऱ्हेने घाटावी, याची माहिती ते तबलावादकांना देत असत. गायकवाड यांनी बनविलेला मधु पियानो इंग्रजांना इतका आवडला होता की, त्यांनी तो पियानो लंडनमध्ये नेला होता. यासोबतच त्यांचे स्टेट डेकोरेशनमध्ये प्रसिद्ध नाव होते. ते महाल येथील संघबिल्डिंगच्या मागे राहत. नंतर ते मानेवाडा येथील विठ्ठलनगरात वास्तव्यास होते. त्यांच्या कौशल्याबद्दल पं. जवाहरलाल नेहरू यांनाही आदर होता आणि त्यांनी त्यांना कौतुकाचे पत्रही लिहिले होते.

Web Title: Correspondent Manohar Gaikwad passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.