नागपूर लाईव्ह सिटी अॅपमधील घोळ तात्काळ दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:12+5:302021-02-08T04:08:12+5:30
नागपूर : गेल्या गुरुवारपासून नागपूर लाईव्ह सिटी अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ...

नागपूर लाईव्ह सिटी अॅपमधील घोळ तात्काळ दुरुस्त करा
नागपूर : गेल्या गुरुवारपासून नागपूर लाईव्ह सिटी अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचला असून, कुठे तक्रार करावी, हा प्रश्न नागरिकांसमाेर निर्माण झाला आहे. महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी हे ॲप सुरू केले हाेते आणि अल्पावधितच ते लोकप्रिय झाले. या माध्यमातून तक्रारींचे तत्काळ निवारण होते. नागरिक या सेवेमुळे खूश असले तरी काही पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये याविषयी तीव्र असंतोष आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक तांत्रिक बिघाड घडवून हे अॅप बंद करण्याचे षड्यंत्र तर केले नसेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
सर्व तक्रारी अॅपच्या माध्यमातून सुटणार असतील, तर आमची गरज काय, असा सवाल अनेक नगरसेवकांना पडला आहे. पूर्वी तक्रारींसाठी नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागायच्या. मात्र नागरिकांच्या समस्या साेडविणे या अॅपच्या माध्यमातून साेपे झाले हाेते. लोकांसाठी हे अॅप अत्यंत फायदेशीर असून ते सुरु ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. याबद्दल काही तांत्रिक अडचण असल्यास तातडीने दूर करून या अॅपच्या माध्यमातून देत असलेल्या सेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी नागपूर सिटिझन्स फोरमने केली आहे.