मनपाचे सहा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:11 IST2021-09-10T04:11:44+5:302021-09-10T04:11:44+5:30
नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या महापालिका शाळांतील सहा शिक्षकांना गुुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

मनपाचे सहा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या महापालिका शाळांतील सहा शिक्षकांना गुुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात हा समारोह पार पडला.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मान्यवरांनी सहा शिक्षकांना सन्मानित केले. यात सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळेच्या कल्पना माळवे, वाठोडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचे ईश्वर धुर्वे, सदर उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शाहीन कौसर सय्यद, बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन शाळेचे संदीप अभ्यंकर, साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेचे अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळेचे काजी नुरुल लतीफ यांचा समावेश आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे व उपसभापती सुमेधा देशपांडे यांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्य परिणिता फुके, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आणि पुरस्कारप्राप्त शिक्षक आपल्या परिवारासह उपस्थित होते. संचालन मधू पराड यांनी तर आभार सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी मानले.