मनपा ऑक्सिजनचे २३० बेड उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:05+5:302021-04-16T04:08:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड ...

Corporation will provide 230 oxygen beds | मनपा ऑक्सिजनचे २३० बेड उपलब्ध करणार

मनपा ऑक्सिजनचे २३० बेड उपलब्ध करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. शहरातील परिस्थिती गंभीर आहे. दिलासादायक म्हणजे मनपाच्या केटीनगर रुग्णालयात १२० तर पाचपावली रुग्णालयात ११० अशा २३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जात आहे. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

मनपाची पाच रुग्णालये अपग्रेड करण्यात आलेली आहेत. या रुग्णालयात ४०० बेड उपलब्ध होऊ शकतात. परंतु यातील इंदिरा गांधी रुग्णालयात ११० बेड उपलब्ध आहेत. आता केटीनगर व पाचपावली केंद्राचा समावेश आहे. मात्र येथे व्हेंटिलेटर व आयसीयू सुविधा राहणार नाही. दुसऱ्या जागेत ऑक्सिजन बेड उपलब्ध करावयाचे झाल्यास यावर मनपाला खर्च करावा लागणार आहे. कोरोना संकट टळल्यानंतर याचा उपयोग होणार नाही. परंतु मनपा रुग्णालयावर खर्च केल्यास या सुविधा कायमस्वरूपी राहतील.

...

१३६ खाटांचे कोविड रुग्णालय

श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय येथे १३६ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी भारतीय वैद्यक समन्वय समितीच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली. पक्वासा रुग्णालय येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मनपा डॉक्टरांची व्यवस्था करणार आहे. दरम्यान, महापौरांनी गुरुवारी येथे पाहणी केली. रुग्णालय पुढच्या सात दिवसामध्ये कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ. गोविंद उपाध्याय, प्राचार्य डॉ. मोहन येवले, डॉ. जय छांगाणी, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Corporation will provide 230 oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.