मनपाकडे चेंबर दुरुस्तीसाठी पैसा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:39+5:302021-02-16T04:08:39+5:30
नागरिक त्रस्त : पाॅप्युलर सोसायटी परिसरातील तक्रारीची प्रशासनाकडून दखल नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती ...

मनपाकडे चेंबर दुरुस्तीसाठी पैसा नाही
नागरिक त्रस्त : पाॅप्युलर सोसायटी परिसरातील तक्रारीची प्रशासनाकडून दखल नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असली तरी चेंबर दुरुस्तीसाठी एक-दोन लाख रुपये नाही इतकी वाईट स्थिती नक्कीच नाही. परंतु तिजोरीत पैसा नसल्याचे कारण पुढे करून नागरिकांच्या तक्रारींची प्रशासन व नगरसेवकांकडून दखलच घेतली जात नाही. अशा परिस्थितीत दुर्गंधीचा त्रास आणखी किती दिवस सहन करावा, असा प्रश्न प्रभाग ३५ मधील मनीषनगर भागातील अथर्व ग्लाेरी, पाॅप्युलर सोसायटी परिसरातील नागरिकांना पडला आहे.
चार महिन्यांपूर्वी अथर्व ग्लोरीच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफार्मरजवळील चेंबर फुटले. मनपाचे कर्मचारी येतील दुरुस्ती करतील अशी आशा परिसरातील नागरिकांना होती. परंतु महिना-दोन महिने प्रतीक्षा केल्यानंतरही प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही. अखेर नागरिकांनी धंतोली झोन, मनपा मुख्यालय व आयुक्तांकडे फुटलेल्या चेंबरची तक्रार केली. पण महिना झाला तरी दखल नाही. चेंबर फुटल्याने बाजूच्या मोकळ्या प्लाॅटवर दूषित पाणी साचले आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. तसेच घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अत्यावश्यक कामासंदर्भात तक्रार करूनही प्रशासन व नगरसेकांकडून दखल घेतली जात नसेल तर नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
....
नागरिकांनी कर का भरावा?
वस्त्यातील गडर लाइन, चेंबर दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे
....
निधी नसल्याने मंजुरी थांबली होती
आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने गेल्या वर्षभरात प्रभागातील कोणत्याही स्वरुपातील विकासकामे झालेली नाही. नागरिक तक्रार करतात
जयश्री वाडीभस्मे, नगरसेविका