राजधानी एक्स्प्रेसमध्ये कोरोनाची दहशत : प्रवासी घाबरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 21:16 IST2020-03-21T21:15:15+5:302020-03-21T21:16:33+5:30

कॉरेन्टाईन करून ठेवण्यात आलेले नवदाम्पत्य राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते. हात धुतल्यानंतर त्यांच्या हातावरील स्टॅम्प दिसताच इतर प्रवासी घाबरले.दाम्पत्याला काजीपेठ रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले.

Coroner's Panic Passengers Terrified at Rajdhani Express | राजधानी एक्स्प्रेसमध्ये कोरोनाची दहशत : प्रवासी घाबरले 

राजधानी एक्स्प्रेसमध्ये कोरोनाची दहशत : प्रवासी घाबरले 

ठळक मुद्देहातावर स्टॅम्प दिसताच नवदाम्पत्याला घेतले ताब्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु काही प्रवासी मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नांना गालबोट लावत आहेत. याकॉरेन्टाईन करून ठेवण्यात आलेले नवदाम्पत्य राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते. हात धुतल्यानंतर त्यांच्या हातावरील स्टॅम्प दिसताच इतर प्रवासी घाबरले. दाम्पत्याला काजीपेठ रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले. त्यांच्या कोचमधील प्रवाशांना इतर कोचमध्ये हलविण्यात येऊन राजधानी एक्स्प्रेसच्या बी ३ कोचला कुलूप लावण्यात आले.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेले दाम्पत्य दिल्लीतील आहे. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. हनिमूनसाठी ते बाली येथे गेले होते. तेथून ते हैदराबादला परतले. पण, विदेशातून आल्याने त्यांना कॉरेंटाईन करून ठेवण्यात आले होते. नियमाप्रमाणे त्यांच्या हातावर स्टॅम्पही लावण्यात आला आहे. संधी मिळताच दोघांनीही पळ काढत सिकंदराबाद गाठले. रेल्वेगाडी क्रमांक २२६९१ राजधानी एक्स्प्रेसच्या बी ३ कोचमधून ते दिल्लीकडे जात होते. आपले हात लपवूनच त्यांचा प्रवास सुरू होता. नववधू हात धुण्यासाठी गेली असता तिच्या हातावरील स्टॅम्प सहप्रवाशाला दिसला. त्याने टीसीला माहिती दिली. त्यानंतर बी ३ कोचमध्ये एकच खळबळ उडाली. काजीपेठ स्टेशनवर तपासणी केली असता दोघांनाही ताप असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कोचमधील सर्वच प्रवाशांना उतरवून दुसऱ्या कोचमध्ये बसविण्यात आले. फवारणी करून निर्जंतुकीकरण केल्यानंतर संपूर्ण कोच ‘लॉकडाऊन' करण्यात आला. सायंकाळी ५.३० वाजता ही गाडी नागपूर स्टेशनवर पोहोचताच सर्व डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हाताचा सतत स्पर्श होणाऱ्या आणि तोंडाजवळ असणाऱ्या भागांची सॅनिटायझरने स्वच्छता करण्यात आली. गाडीत कोरोना संशयित प्रवासी असल्याची माहिती पसरल्याने अन्य प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे प्रवासी मोहम्मद निसाख, अभिषेक कुमार, प्रणय रॉय यांनी प्रकाराबाबत चिंता व्यक्त करून रेल्वे प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.

रेल्वेगाड्यामध्ये वाढली गर्दी
कोरोनाच्या भीतीने गेल्या आठवडाभरापासून रेल्वे प्रवाशांची गर्दी कमालीची कमी झाली आहे. यामुळे रेल्वेगाड्याही रद्द करण्यात येत आहेत. शनिवारी मात्र रेल्वेगाड्यांमध्ये गर्दीचे चित्र होते. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. ही स्थिती कधीपर्यंत राहील हे स्पष्ट नाही. यामुळे विद्यार्थी, कष्टकरी आपापल्या गावाकडे परत जात आहेत.

Web Title: Coroner's Panic Passengers Terrified at Rajdhani Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.