CoronaVirus in Vidarbha : विदर्भात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या चार हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 12:55 AM2021-03-16T00:55:27+5:302021-03-16T00:56:47+5:30

CoronaVirus in Vidarbha विदर्भात कोरोनाचा वेग वाढतच चालला आहे. सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या चार हजारांवर गेली. सोमवारी ४,३६१ रुग्ण व ३० मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus in Vidarbha: For the fifth day in a row, the number of patients in Vidarbha is over four thousand | CoronaVirus in Vidarbha : विदर्भात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या चार हजारांवर

CoronaVirus in Vidarbha : विदर्भात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या चार हजारांवर

Next
ठळक मुद्दे४,३६१ रुग्णांची भर, ३० मृत्यू : नागपुरात २,२९७, बुलडाण्यात ५३३, अमरावतीत ३७९ रुग्णांची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विदर्भात कोरोनाचा वेग वाढतच चालला आहे. सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या चार हजारांवर गेली. सोमवारी ४,३६१ रुग्ण व ३० मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,७५,५७४ झाली आहे ११ जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दोन हजारावर गेली. २,२९७ रुग्ण व १२ मृत्यूची नोंद झाली. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले. ५३३ रुग्ण व १ रुग्णाचा बळी गेला. अमरावती जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या स्थिर आहे. ३७९ रुग्ण आढळून आले व ६ रुग्णांचे जीव गेले. यवतमाळ जिल्ह्यात ३६७ रुग्ण व ६ मृत्यू, अकोल्यात २४८ रुग्ण व २ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात २०८ रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ११३ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. चंद्रपूर व भंडाऱ्यात हळूहळू का हाेईना रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.

जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू

नागपूर : २२९७ : १७२७९९: १२

वर्धा : ११३ : १४९४६: ०२

गोंदिया : ४९: १४७५५ : ००

भंडारा : ८२ : १४४१० : ००

चंद्रपूर : ६५ : २४८४३ : ००

गडचिरोली : २० : ९९०६ :००

अमरावती : ३७९ : ४२८७६ : ०६

वाशिम : २०८ : ११४२७ : ०१

बुलढाणा : ५३३ : २५६६३ : ०१

यवतमाळ : ३६७ : २२१०२ : ०६

अकोला : २४८ : २१८४७ : ०२

Web Title: CoronaVirus in Vidarbha: For the fifth day in a row, the number of patients in Vidarbha is over four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.