शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या घटल्या, रुग्णसंख्येतही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:35 PM

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्दे ४,६३३ चाचण्या : १,००२ रुग्ण पॉझिटिव्ह : मागील १५ दिवसातील सर्वात कमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मात्र, रोजच्या मृत्यूचे सत्र कायम आहे. आज ४४ रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या १७०२ तर बाधितांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. या महिन्यात तीन दिवस रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेल्याने चिंतेचे वातावरण होते. ८ सप्टेंबर रोजी ८,३०८ चाचण्या झाल्या, यात २,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ११ सप्टेंबर रोजी ८,८७४ चाचण्या झाल्या, यात २,०६० रुग्णांचे निदान झाले. १३ सप्टेंबर रोजी ७,९७३ चाचण्या झाल्या, यात २,३४३ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आज शहरामध्ये २,३९७ तर ग्रामीणमध्ये के वळ ८२ अशा एकूण २,४७९ चाचण्या झाल्या. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या शहरामध्ये १,४९९ तर ग्रामीणमध्ये ६५५ अशा एकूण २,१५४ झाल्या. या चाचण्यांतून ३१० रुग्ण पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर चाचणीतून ६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६७०, ग्रामीणमील ३२९ तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्ण आहेत.क्षमतेच्या तुलनेत चाचण्या कमीमेडिकलच्या प्रयोगशाळेत एका दिवसात चाचण्यांची क्षमता ७५०वर असताना आज ५६२ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता २००वर असताना १६७ चाचण्या झाल्या. ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता ७००वर असताना ४८८ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. माफसूच्या प्रयोगशाळेची क्षमता २०० असताना १९३ चाचण्या झाल्या. ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेची क्षमता २५० असताना २१८ चाचण्या झाल्या. ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.४० हजार रुग्ण बरेकोरोनाबाधित असलेले १५१८ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०,६६७ झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण ७६.०५ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३२,९९६ तर ग्रामीणमधील ७६७१ रुग्ण आहेत. सध्या ११,१०४ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ४४५५बाधित रुग्ण : ५३,४७३बरे झालेले : ४०,६६७उपचार घेत असलेले रुग्ण : १११०४मृत्यू :१७०२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर