CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या घटल्या, रुग्णसंख्येतही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:35 PM2020-09-14T23:35:52+5:302020-09-14T23:37:01+5:30

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

CoronaVirus in Nagpur: Tests decline in Nagpur, number of patients also decreases | CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या घटल्या, रुग्णसंख्येतही घट

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या घटल्या, रुग्णसंख्येतही घट

Next
ठळक मुद्दे ४,६३३ चाचण्या : १,००२ रुग्ण पॉझिटिव्ह : मागील १५ दिवसातील सर्वात कमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मात्र, रोजच्या मृत्यूचे सत्र कायम आहे. आज ४४ रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या १७०२ तर बाधितांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. या महिन्यात तीन दिवस रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेल्याने चिंतेचे वातावरण होते. ८ सप्टेंबर रोजी ८,३०८ चाचण्या झाल्या, यात २,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ११ सप्टेंबर रोजी ८,८७४ चाचण्या झाल्या, यात २,०६० रुग्णांचे निदान झाले. १३ सप्टेंबर रोजी ७,९७३ चाचण्या झाल्या, यात २,३४३ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आज शहरामध्ये २,३९७ तर ग्रामीणमध्ये के वळ ८२ अशा एकूण २,४७९ चाचण्या झाल्या. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या शहरामध्ये १,४९९ तर ग्रामीणमध्ये ६५५ अशा एकूण २,१५४ झाल्या. या चाचण्यांतून ३१० रुग्ण पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर चाचणीतून ६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६७०, ग्रामीणमील ३२९ तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्ण आहेत.

क्षमतेच्या तुलनेत चाचण्या कमी
मेडिकलच्या प्रयोगशाळेत एका दिवसात चाचण्यांची क्षमता ७५०वर असताना आज ५६२ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता २००वर असताना १६७ चाचण्या झाल्या. ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता ७००वर असताना ४८८ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. माफसूच्या प्रयोगशाळेची क्षमता २०० असताना १९३ चाचण्या झाल्या. ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेची क्षमता २५० असताना २१८ चाचण्या झाल्या. ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

४० हजार रुग्ण बरे
कोरोनाबाधित असलेले १५१८ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०,६६७ झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण ७६.०५ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३२,९९६ तर ग्रामीणमधील ७६७१ रुग्ण आहेत. सध्या ११,१०४ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ४४५५
बाधित रुग्ण : ५३,४७३
बरे झालेले : ४०,६६७
उपचार घेत असलेले रुग्ण : १११०४
मृत्यू :१७०२

Web Title: CoronaVirus in Nagpur: Tests decline in Nagpur, number of patients also decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.