शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक! नागपुरात एकाच दिवशी २५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 11:15 PM

कोरोना संसर्गाचा वेग नागपूर जिल्ह्यात कमालीचा वाढला असताना मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी तब्बल २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २५० नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्दे २५० नव्या रुग्णांची भर : सहा दिवसात १०३ रुग्ण बाधित : दोन पोलिसांचा मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा वेग नागपूर जिल्ह्यात कमालीचा वाढला असताना मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी तब्बल २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २५० नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्या २२९ झाली असून रुग्णांची संख्या ७,२९१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०३ कोरोनाबाधितांचे बळी गेले. यात दोन पोलिसांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.मेयो, मेडिकल व खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता कोविड केअर सेंटरमध्येही रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. मेयोमध्ये आज सहा कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. यात मोमिनपुरा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा पहाटे १.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाला अस्थमासोबतच इतरही आजार होते. तांडापेठ जुनी वसाहती येथील ५६ वर्षीय पुरुषाला उच्च रक्तदाब व अनियंत्रित टाईप टू मधुमेह होता. सारीचा रुग्ण असलेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. कळमेश्वर येथील २६ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होता. उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. कळमना येथील ६४ वर्षीय पुरुषाला न्युमोनियासोबतच टाईप टू मधुमेह व उच्च रक्तदाब होता. आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. तेलंगखेडी हनुमानमंदिर परिसरातील ६० वर्षीय महिलेला न्युमोनियासोबतच उच्च रक्तदाबाचा विकार होता. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. महाजनपुरा पारडी येथील ६८ वर्षीय पुरुषाला न्युमोनिया, उच्च रक्तदाबासोबतच हृदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरू असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. मेडिकल व खासगी हॉस्पिटलमधील उर्वरित मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालयातून उपलब्ध होऊ शकली नाही.मेडिकलमधून १२५ रुग्ण पॉझिटिव्हमेडिकलच्या प्रयोगशाळेत चाचण्यांचा वेग वाढला. आज १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या प्रयोगशाळेतील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा उच्चांक आहे. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेत १०२, एम्सच्या प्रयोगशाळेतून ६८, नीरीच्या प्रयोगशाळेतन ७५, माफसुच्या प्रयोगशाळेतून २५, खासगी लॅबमधून ५८, अ‍ॅण्टिजेन चाचणीतून ८६ असे एकूण ५३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ४,०८५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २,९७७ रुग्ण उपचाराखाली आहेत.फाईल अदलाबदल झाल्याने जिवंत रुग्णाची मृत्यूची नोंदमेडिकलमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णसेवेचा प्रचंड ताण वाढला आहे. यातूनच फायलीची अदलाबदल झाल्याने एका रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्तापाला सामोर जावे लागले. झाले असे की, गुरुवारी कामठी येथील ७० वर्षीय रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याचदरम्यान ताजबाग येथील ६५वर्षीय पुरुष रुग्णालाही भरती केले. ७० वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. दाखल करीत असताना ६५ वर्षीय रुग्णाची फाईल ७० वर्षीय रुग्णासोबत गेली. उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांना याची माहिती दिल्यावर त्यांच्यात शोककळा पसरली. मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी ओळख पटवली जात असताना नातेवाईंकानी मृतदेह आपल्या ओळखीचा नसल्याचे सांगताच, गोंधळ उडाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू