CoronaVirus in Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णवाढीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:30 PM2021-01-01T23:30:00+5:302021-01-01T23:31:28+5:30

CoronaVirus,patients increased, nagpur news मागील काही दिवसांपासून ३५०च्या खाली गेलेली दैनंदिन बाधितांची संख्या शुक्रवारी ३९९वर पोहचली. नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णवाढीचा दणका पडल्याने चिंता निर्माण झाली आहे.

CoronaVirus in Nagpur: The onset of the new year patients increased | CoronaVirus in Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णवाढीचा दणका

CoronaVirus in Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णवाढीचा दणका

googlenewsNext
ठळक मुद्दे३९९ नव्या रुग्णांची भर, १० मृत्यू : ३६३ रुग्ण बरे, चाचण्यांची संख्या मंदावलेलीच

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मागील काही दिवसांपासून ३५०च्या खाली गेलेली दैनंदिन बाधितांची संख्या शुक्रवारी ३९९वर पोहचली. नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णवाढीचा दणका पडल्याने चिंता निर्माण झाली आहे. आज १० रुग्णांचा जीवही गेला. रुग्णांची एकूण संख्या १,२४,१६६ झाली असून मृतांची संख्या ३,९४०वर पोहचली. विशेष म्हणजे, रोजच्या चाचण्यांची संख्या मंदावली असताना रुग्णसंख्या वाढली आहे.

नागपूर जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळेत क्षमतेच्या तुलनेत कोरोनाच्या कमी चाचण्या होत आहेत. आज ४,६४२ चाचण्या झाल्या. यात ३,७५२ आरटीपीसीआर तर ८९० रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआर चाचणीतून ३६२ तर अँटिजेन चाचणीतून ३७ बाधित रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधून शहरातील ३१५, ग्रामीण भागातील ८१ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील ३ आहेत. आज ३६३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १,१६,४१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ९३.७६ टक्के आहे. सध्या ३,८०८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १,२९८ शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये तर २,५१० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

 मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

मागील दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढताच याचा भार खासगीसह शासकीय रुग्णालयांवर पडला. मेयोमध्ये बाधितांची संख्या वाढून ९० झाली आहे तर मेडिकलमध्ये १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एम्समध्ये ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूणच शासकीय रुग्णालयांमध्ये २७८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १०२० रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, ९१ खासगी हॉस्पिटलमधून शून्य रुग्ण असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

दैनिक संशयित : ४,६४२

बाधित रुग्ण : १,२४,१६६

बरे झालेले : १,१६,४१८

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३,८०८

 मृत्यू : ३,९४०

Web Title: CoronaVirus in Nagpur: The onset of the new year patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.