शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

कोरोना संसर्गानंतर वाढतोय सायनस फंगस ‘म्युकरमायकोसिसचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 07:00 IST

Coronavirus in Nagpur सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. आता कोरोनापश्चात लक्षणांसह ईएनटी डॉक्टरांकडे या बुरशीच्या प्रादुर्भावाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देऔषधांमुळे रोगप्रतिकारक्षमता ढासळणे ठरतेय कारण वेळेत उपचार न घेतल्यास गंभीर होतो आजार

प्रवीण खापरे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वाढलेल्या धास्तीत अनेक आजार जणू पळून गेले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. सर्वत्र कोरोनाची चर्चा, त्याचे दिसून येणारे दुष्परिणाम, वाढलेले मृत्यू, उपचार-औषधांचा तुटवडा यामुळे सगळेच जण खजिल झाले आहेत. मात्र, त्यात आता कोरोनापश्चात होणार्‍या विकारांची भर पडली आहे.

सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. पूर्वी म्युकरमायकोसिस विकाराचे वर्षातून एखादं-दोन रुग्ण आढळत होते. मात्र, आता कोरोनापश्चात लक्षणांसह ईएनटी डॉक्टरांकडे या बुरशीच्या प्रादुर्भावाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार हजार कोरोना रुग्णांमागे २० रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष म्हणजे, कोरोना संक्रमणानंतर या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रभाव म्हणून अनेक रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेकदा स्थिती गंभीर झाल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जात असल्याने रोग हाताबाहेर जात असल्याचे आढळून येत आहे. जर या रोगावर वेळीच उपचार केला नाही तर जबडा, डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. मेंदूत प्रादुर्भाव झाला तर मृत्यूदेखील होऊ शकतो.

सायनस फंगस - म्युकरमायकोसिस

ज्यांना दीर्घकालिन मधुमेह, कर्करोग, कमी रोगप्रतिकारक्षमता असलेला एचआयव्ही आहे; त्यांना साधारणतः हा आजार संभवत होता. मात्र, कोविड-१९ पश्चात रुग्णांची इम्युनिटी प्रचंड ढासळलेली असते. सोबतच या संक्रमणादरम्यान अपरिहार्य औषधांचा प्रचंड मारा, विशेषत: स्टेरॉईडचा वापर या फंगसला वाव देत आहे. चेहर्‍यावरील नाकाच्या अवतीभवती असलेल्या हाडाच्या पोकळीला सायनस असे म्हणतात. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने या गॅपमध्ये म्युकरमायकोसिस फंगस अर्थात बुरशी तयार होत असते. ही बुरशी दात, हिरड्या, डोळे आणि मेंदूपर्यंत पसरत जाते. ती मेंदूत गेल्यावर स्थिती गंभीर होते आणि मृत्यूचा धोका संभवतो. जिथे-जिथे ही बुरशी पसरत जाते, तिथे-तिथे तो भाग सडायला लागतो आणि त्यामुळे तो भाग सर्जरीद्वारे काढावा लागतो. हा काढलेला भाग नंतर रि-कन्स्ट्रक्ट करण्यात येतो. मात्र, चेहरा डॅमेज झालेला असतो.

आजाराची पूर्व लक्षणे

कोरोनानंतर सर्दी, खोकला, डोके दुखणे हे कोरोनाचेच भाग असल्याने रुग्ण दुर्लक्षित करतो. मात्र, अशीच काहीशी लक्षणे म्युकरमायकोसिसची आहेत. डोके दुखणे, दात दुखणे व हलणे, हिरड्यांत वेदना, टाळूवर काळसपणा व वेदना, चेहर्‍यावर वेदना, नाकातून काळा स्त्राव वाहणे, ही म्युकरमायोसिसचीच लक्षणे आहेत. यावर वेळीच निदान करवून घेत उपचार सुरू केल्यास पुढचा धोका टाळता येतो.

लक्षणे आढळताच कान-नाक-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधा

हा आजार कोरोना इतकाच जीवघेणा आहे. वर्तमान स्थितीत या आजाराचा प्रसार वाढलेला दिसतो आणि वर्तमान नव्या जागतिक आकडेवारीनुसार कोरोनाच्या एक हजार कोरोना संक्रमित रुग्णांपैकी २०मध्ये हा आजार दिसून येत आहे. जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळा गमवावा लागतो, कुणाचा जबडा काढावा लागतो. एकूणच जीव वाचविण्यासाठी हे सगळं करावं लागतं. हा आजार एका अर्थाने तोंडाच्या कर्करोगासारखाच असला तरी कर्करोग नाही, हे समजून घ्यावे. याची लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे

कान-नाक-घसा तज्ज्ञ,

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो हॉस्पिटल)

 

.................

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस