शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus in Nagpur : आजाराची माहिती लपवल्याने अनेकांचा जीव धोक्यात  : नागपुरातील जरीपटका परिसरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 01:05 IST

जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी पुढे आल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला. बेजबाबदार रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देरुग्णाचा असाही बेजबाबदारपणा : मनपाची यंत्रणा सतर्क झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी पुढे आल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला. बेजबाबदार रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.रुग्णावर उपचार करणाऱ्या नऊ डॉक्टरांसह इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले आहे. तसेच त्याची पत्नी व मुलीलाही या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.रुग्णाने कोरोनाग्रस्त असल्याचे लपवले. त्याची प्रकृती खालावल्यावर प्रथम जरीपटक्यातील जनता हॉस्पिटल गाठले. येथे उपचारादरम्यान त्याला एमआरआयसाठी एका खासगी केंद्रात पाठवले गेले. येथे तपासणी केल्यावर या रुग्णाने शनिवारी मध्यरात्री मेडिकल गाठले. आकस्मिक विभागातील डॉक्टरांनी विचारणा केल्यावरही रुग्णाने त्याचा कोरोनाशी संबंधित व्यक्तीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याला श्वास घ्यायला त्रास, पक्षाघात झाल्याने सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसल्यावर त्याचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी त्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर त्याने त्याचा भाऊ व पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. दरम्यान, त्याच्या संपर्कात आल्याने येथील नऊ डॉक्टर, आठ परिचारिका, तीन आंतरवासिता डॉक्टर यांना खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.रुग्णाच्या या बेजबाबदारपणामुळे जरीपटका भागातील नागरिकात दहशत पसरली. महापालिका प्रशासन सतर्क झाले. जरीपटका परिसरात निर्जंतुकीकरणाची माोहीम हाती घेतली. सोमवारी जनता हॉस्पिटल सील करण्याात आले.जीवनावश्यक वस्तू घरपोच पाठविण्याला प्राध्यान्यपाच कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण परिसराला लॉकडाऊन करण्यात आले. परिसरातील बहुतांश नागरिक एकमेकांचे परिचित व संपर्कातील असल्याने जीवनावश्यक तसेच गरजेचे साहित्य घरपोच पाठविण्यास प्राधान्य दिले जात आहे. ‘कम्युनिटी स्प्रेड’ टाळण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक व आरोग्य समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी नागरिकांना जीवनावश्यक सामान घरीच मागवून घेण्यास सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर