CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:03 PM2020-09-26T23:03:23+5:302020-09-26T23:04:48+5:30

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली.

CoronaVirus in Nagpur: Decrease in corona deaths in Nagpur | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

Next
ठळक मुद्दे३८ मृत्यू तर १,२०५ रुग्णांची नोंद : शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली. आज १,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील आठ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या ७४,२३१ झाली असून मृतांची संख्या २,३४०वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. ऑगस्ट महिन्यात १५ ते ३० दरम्यान रोज मृत्यूची नोंद व्हायची परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मृतांचा आकडा ४०वर गेला. १६ सप्टेंबर रोजी ६० वर तर १७ सप्टेंबर रोजी मृतांची संख्या ६४ वर गेली होती. या आठवड्यात ही संख्या ४० ते ५०च्या घरात होती. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील १,७११, ग्रामीणमधील ४०२ तर जिल्ह्याबाहेरील २२७ आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१५ टक्के आहे.

आठवड्यात ३३० मृत्यू, ८,४४२ पॉझिटिव्ह
या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात ३३० रुग्णांचे बळी गेले तर ८,४४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मृत्यू व रुग्णसंख्येत किंचीत घट आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मेडिकलमध्ये झाले. १,०३७ मृत्यूची नोंद आहे. मेयोमध्ये ९५४ तर एम्समध्ये तीन बळी गेले. उर्वरित ३४० रुग्णांचे मृत्यू खासगी हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.

३,२३१ अ‍ॅन्टिजेन चाचणीतून २,९९६ रुग्ण निगेटिव्ह
आज ३,२३१ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात २३५ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,९९६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीत एम्सच्या प्रयोगशाळेतून १८९, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६५, मेयोच्या प्रयोगशाळेतून १७१, माफसुच्या प्रयोगशाळेतून ५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६९ तर खासगी लॅबमधून ४२४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.

बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
आज १,२०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असले तरी १,५३६ रुग्ण बरे झाले. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५६,६१६ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील ४५,६५३ तर ग्रामीणमधील १०,९६३ रुग्ण आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७६.२७ टक्के आहे. सध्या १५,२७५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,२६०
बाधित रुग्ण : ७४,२३१
बरे झालेले : ५६,६१६
उपचार घेत असलेले रुग्ण : १५,२७५
मृत्यू : २,३४०

Web Title: CoronaVirus in Nagpur: Decrease in corona deaths in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.