शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:21 IST

Corona Virus, Nagpur news मागील काही दिवसांपासून ३५० ते ४५० वर जाणाऱ्या बाधितांच्या संख्येत सोमवारी दुपटीने घट झाली. १५० नव्या बाधितांची व ९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन पाच हजारावर जाणाऱ्या चाचण्या अर्ध्यावर आल्याने रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे१५० बाधित, ९ मृत्यू : चाचण्यांची संख्या आली अर्ध्यावर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मागील काही दिवसांपासून ३५० ते ४५० वर जाणाऱ्या बाधितांच्या संख्येत सोमवारी दुपटीने घट झाली. १५० नव्या बाधितांची व ९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, दैनंदिन पाच हजारावर जाणाऱ्या चाचण्या अर्ध्यावर आल्याने रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची एकूण संख्या १३०६१९, तर मृतांची संख्या ४०८१ वर गेली आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी २०७६ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर, तर ५०२ रुग्णांची रॅपिड अँटिजेन, अशा एकूण २५७८ चाचण्या करण्यात आल्या. मागील दोन महिन्यात प्रथमच एवढ्या कमी चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून ५२, तर आरटीपीसीआर चाचणीतून ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३०, ग्रामीणमधील १७, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील २, तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. सध्या ३९६० रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ९७५ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत, तर ३८४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

 ३९४ रुग्ण बरे

नागपूर जिल्ह्यात सोमवारी ३९४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२२५७८ झाली. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये रविवारी १६२ रुग्ण उपचाराखाली होते. सोमवारी ही संख्या ७० वर आली. दिवसभरात ९२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिल्याचे दिसून येते, तर, मेयोमध्ये रविवारी ५२ रुग्ण भरती होते, सोमवारी ही संख्या वाढून ७९ वर गेली आहे.

 दैनिक संशयित : २५७८

 बाधित रुग्ण : १३०६१९

 बरे झालेले : १२२५७८

उपचार घेत असलेले रुग्ण : ३९६०

 मृत्यू : ४०८१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर