शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:17 IST

एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे बाधित रुग्णाकडून पती, मुलगा पॉझिटिव्ह : रुग्णाची संख्या १६

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्वांनाच अहवालाची प्रतीक्षा आहे. आज दिवसभरात एका कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी व मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णासह नागपुरात रुग्णाची संख्या १६ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील ५५ वर्षीय व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून नागपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. डॉक्टरानुसार रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. त्याचे सिटिस्कन केले असता न्युमोनिया असल्याचे दिसून आले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व न्युमोनिया रुग्णांची चाचणी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार या रुग्णाच्या चाचणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेयोला आणले. रुग्णाला वॉर्ड क्र. ४ मध्ये दाखल करण्यात आले. परंतु दोन तासातच त्याचा मृत्यू झाला. कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूने सर्वांनाच नमुन्याचा काय अहवाल येतो, याची प्रतीक्षा लागली आहे. 

आठ डॉक्टर, चार पॅरामेडिकल स्टाफ संशयितसोमवारी पहाटे दोन रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. हे रुग्ण दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या छोट्या भावाची ३२ वर्षीय पत्नी आणि ११ वर्षीय मुलगा आहे. पॅरालिसीसच्या उपचारासाठी आलेल्या या रुग्णाने भाऊ पॉझिटिव्ह असल्याची बाब डॉक्टरांपासून लपवून ठेवली होती. यामुळे त्याच्या संपर्कात आलेले मेडिकलच्या आठ डॉक्टरांसह चार पॅरामेडिकल स्टाफला कोरोना संशयित म्हणून ‘होम क्वारंटाइन’ केले.

३२ नमुने निगेटिव्ह२९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबासह इतर नातेवाईक व मित्र व शेजारचे मिळून असे ३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आज दिवसभरात मेडिकलमध्ये ६४ तर मेयोमध्ये ३२ असे एकूण ९५ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूnagpurनागपूर