शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

CoronaVirus in Nagpur : दिलासा कायम, मृत्यूसंख्या मात्र चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:10 IST

Coronavirus in Nagpur जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजाराच्या खाली आला, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच असून ही संख्या लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे४,२९९ पॉझिटिव्ह तर ८१ मृत्यू : २४ तासात ७,४०० रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजाराच्या खाली आला, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच असून ही संख्या लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

बुधवारी नागपूर जिल्ह्यात ४ हजार ३९९ रुग्ण आढळले. यातील २ हजार ५३४ रुग्ण नागपूर शहरातील, तर १ हजार ८५३ रुग्ण ग्रामीण भागातील होते. २४ तासात ७ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ४ हजार ६८२ रुग्ण शहरातील, तर २ हजार ७१८ रुग्ण ग्रामीण भागातील होते. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मृत्यूंची संख्या वाढली. ८२ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ४८, ग्रामीणमधील २२, तर जिल्ह्याबाहेरील १२ जणांचा समावेश होता.

बुधवारी सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी झाली. जिल्ह्यात एकूण ६६ हजार ११६ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३६ हजार ६४८ रुग्ण शहरातील, तर २९ हजार ४६८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ५३ हजार ३३९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर विविध रुग्णालयांमध्ये १२ हजार ७७७ रुग्ण दाखल आहेत.

२१ हजाराहून अधिक चाचण्या

२४ तासात २१ हजार ६१२ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १५ हजार २९८, तर ग्रामीणमधील ६ हजार ३१४ नमुन्यांचा समावेश होता. आतापर्यंत जिल्ह्यात २३ लाख ७९ हजार ६१ नमुन्यांची तपासणी झाली आहे.

आतापर्यंतची स्थिती

एकूण पॉझिटिव्ह - ४,३२,९३८

एकूण बरे झालेले रुग्ण - ३,५८,९९४

एकूण मृत्यू - ७,८२८

एकूण चाचण्या - २३,७९,०६१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर