शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक ६० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 00:54 IST

जिल्ह्यात कोरोना संक्रमणासह रुग्णांचा मृत्यूदरही सतत वाढत आहे. बुधवारी सर्वाधिक ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात आधी पाचवेळा ५० व त्यावर मृत्यू झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देएकूण २,०५२ पॉझिटिव्ह : शहरातील १,६२६, ग्रामीणमधील ४१७ रुग्णांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमणासह रुग्णांचा मृत्यूदरही सतत वाढत आहे. बुधवारी सर्वाधिक ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात आधी पाचवेळा ५० व त्यावर मृत्यू झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील ३७, ग्रामीणमधील १४ तर, जिल्ह्याबाहेरच्या ९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १,८१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील १,३५८, ग्रामीणमधील २९१ तर, जिल्ह्याबाहेरच्या १६६ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी २,०५२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात शहरातील १,६२६, ग्रामीणमधील ४१७ तर, जिल्ह्याबाहेरच्या ९ रुग्णांचा समावेश आहे. यासह कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ हजार ४८२ झाली. त्यात शहरातील ४५ हजार ५८८, ग्रामीणमधील ११ हजार ५४६ तर, जिल्ह्याबाहेरच्या ३४८ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत ८,२१६ (शहर-५,८१८, ग्रामीण-२,३९८) नमुने तपासण्यात आले.अ‍ॅन्टिजेन चाचणीत ८०४ पॉझिटिव्हजिल्ह्यात गेल्या २४ तासात ४,००७ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील ८०४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत ६०६, एम्समध्ये ५६, मेडिकलमध्ये २६२, मेयोमध्ये १५५, माफसूमध्ये १४३ तर, नीरीमध्ये २६ नमुने पॉझिटिव्ह आले.१,५०४ रुग्ण बरे झालेजिल्ह्यातील १,५९४ कोरोना रुग्ण बुधवारी बरे झाले. त्यात शहरातील १,४३१ तर, ग्रामीणमधील १६३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४३ हजार ९२७ रुग्ण (शहर-३५,७८७, ग्रामीण-८,१४०) बरे झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर ७६.४२ टक्के झाला आहे.या दिवशी ५० वर मृत्यू२५ ऑगस्ट ५२६ सप्टेंबर ५४७ सप्टेंबर ५०९ सप्टेंबर ५९१० सप्टेंबर ५८११ सप्टेंबर ५३१६ सप्टेंबर ६०सध्या भरती असलेले कोरोना रुग्ण - ११ हजार ७४०कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ४३ हजार ९२७मृत्यू झालेले कोरोना रुग्ण - १,८१५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर