शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:24 IST

एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृतांची संख्या नऊ झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ४४६

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृतांची संख्या नऊ झाली आहे. सतरंजीपुरा येथील ७१ वर्षीय महिलेची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. परंतु घरीच उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री तिला मेयोत दाखल केले. परंतु घरीच तिचा मृत्यू झाला होता. रेड झोनमधील रुग्ण असल्याने तिचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. सतरंजीपुरा वसहतीतील हा दुसरा मृत्यू आहे. नागपुरातील पहिला मृत्यू याच वसाहतीत झाल्यावर १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह आले तर दीड हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंगळवारी १४ दिवस पूर्ण झालेल्या याच वसाहतीतील अनेक संशयितांना क्वारंटाईन सेंटरमधून सोडण्यात आले. आता पुन्हा घरीच मृत्यू झाल्याने पुन्हा या भागातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महिन्यातील हा चौथा मृत्यू आहे. या शिवाय, नाईक तलाव, बांगलादेश, मोमीनपरा, सतरंजीपुरा, कामठी, सावनेर, हावरापेठ व हंसापुरी येथेही रुग्णांची नोंद झाली.नाईक तलाव, बांगलादेश कोरोनाच्या नव्या वसाहतीगेल्या अडीच महिन्यात आतापर्यंत ४५ वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण दिसून आले. यात मोमीनपुरा व सतरंजीपुरा येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. परंतु आता जसजसे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसतसे नव्या वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये गजबजलेली वसाहत असलेल्या नाईक तलाव व बांगलादेश येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय मोमीनपुरा येथून तीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक गर्भवती आहे.हावरापेठ येथे पुन्हा दोन रुग्णहावरापेठ ओंकारनगर येथून मंगळवारी ५२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. आज त्याची ५१वर्षीय पत्नी आणि २३ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला. त्यांचे नमुने एम्समध्ये तपासण्यात आले. या दोघांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्समध्ये सात रुग्ण उपचार घेत आहेत.कामठीत तीन तर सावनेरमधील एक पॉझिटिव्हमुंबई येथून कामठीत आपल्या स्वगृही परतलेले पती, पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचे नमुने एम्समध्ये पॉझिटिव्ह आले. कामठीत आता रुग्णांची संख्या पाच झाली आहे. शिवाय सावनेरमध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळून आला. हा रुग्णही मुंबई येथून आल्याचे बोलले जाते. मेयोच्या प्रयोगशाळेत या रुग्णाची चाचणी झाली. सतरंजीपुरा आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. मात्र त्यानंतरही रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज याच वसाहतीतील एक मृत्यू व एका रुग्णाची नोंद झाली आहे. हंसापुरीतही रुग्ण वाढताना दिसूून येत आहे. आज पुन्हा एका रुग्णाची नोंद झाल्याने या वसाहतीतील रुग्णांची संख्या पाच झाली आहे.नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यूमेळघाट येथील भुतरुंग गावातील नऊ महिन्याच्या मुलाचा आज मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या रुग्णाला गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला व ताप होता. मेडिकलमध्ये याची तपासणी केली असता त्याला ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चे निदान झाले. आतापर्यंत दोन वर्षाच्या आतील रुग्णाचा हा दुसरा मृत्यू आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १३४दैनिक तपासणी नमुने १७९दैनिक निगेटिव्ह नमुने १६६नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४४६नागपुरातील मृत्यू ०९डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५६डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २५३३क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८७पीडित-४४६-दुरुस्त-३५६-मृत्यू-९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर