शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus in Nagpur : १० खासगी कोविड हॉस्पिटलमधील खाटा रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:33 PM

Corona Virus, Covid hospital beds empty, Nagpur News सण उत्सवाच्या तोंडावर कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात खासगी कोविड हॉस्पिटलचा खाटा फुल्ल होत्या. मात्र, आता चित्र पालटले आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : ६०२ नवे रुग्ण, १४ मृत्यू : ३५ हॉस्पिटलमध्ये १०च्यावर रुग्ण नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : सण उत्सवाच्या तोंडावर कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात खासगी कोविड हॉस्पिटलचा खाटा फुल्ल होत्या. मात्र, आता चित्र पालटले आहे. गुरुवारी दहा खासगी हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण नव्हता. तर, ३५ हॉस्पिटलमध्ये १०च्यावर रुग्ण नव्हते. गुरुवारी जिल्ह्यात १४ मृत्यू तर ६०२ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ९२,५९० झाली असून मृतांची संख्या ३,०१४ वर पोहचली.

नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात ६४ रुग्णांच्या मृत्यूने उच्चांक गाठला होता. परंतु त्यानंतर मृतांची संख्या कमी होऊ लागली. मागील आठ दिवसांत दैनंदिन मृत्यूची संख्या २५च्या आत होती. मेयो, मेडिकल व एम्ससह खासगी रुग्णालयांसाठी ही समाधानकारक बाब आहे. आज ६,७०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात झाल्या. यात ३,९९९ आरटीपीसीआर तर २,७९७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या होत्या. रॅपिडमध्ये २५८ तर आरटीपीसीआरमध्ये ३४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत ७५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ५०, एम्सच्या प्रयोगशाळेत ४०, माफसूच्या प्रयोगशाळेत ३१, नीरीच्या प्रयोगशाळेत १५ तर खासगी लॅबमधून १३३ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. मृत्यूदर २.८७ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३३ टक्के झाले आहे.

शहरात सहा तर ग्रामीणमध्ये चार बळी

शहरात आज सहा, ग्रामीणमध्ये चार तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे तीन बळी गेले. आतापर्यंतची ही सर्वात कमी संख्या आहे. बाधितांमध्ये शहरातील ४६०, ग्रामीणमधील १३९ तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. ७३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील शहरातील ५०२ तर ग्रामीण भागातील २३५ आहेत. आतापर्यंत एकूण ८३,६३३ रुग्ण बरे झाले. मेयो, मेडिकल, एम्ससह इतर खासगी हॉस्पिटलमध्ये १,९९८ रुग्ण उपचाराखाली आहेत. ३,९४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या २० दिवसांपासून हे दोन्ही आकडे कमी कमी होत आहेत.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ६७०६

बाधित रुग्ण : ९२५९०

बरे झालेले : ८३६३३

 उपचार घेत असलेले रुग्ण : ५९४३

 मृत्यू : ३०१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल