शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

 CoronaVirus in Nagpur : बाधित रुग्णांच्या संपर्कातील १० नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:38 IST

एकाच कुटुंबातील चार व त्यांच्याकडे काम करणाऱ्या एक अशा पाच रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी सामोर येताच महानगरपालिकेच्या पथकाने बाधित रुग्णांच्या कुटुंबासह मित्र, शेजारी, उपचार करणारे डॉक्टर अशा १४ संशयितांना मेयोत दाखल केले. यात डॉक्टरसह १० संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले.

ठळक मुद्दे१२वर नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा : वसाहतीमध्ये खबरदारीच्या उपाययोजना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : एकाच कुटुंबातील चार व त्यांच्याकडे काम करणाऱ्या एक अशा पाच रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी सामोर येताच पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. महानगरपालिकेच्या पथकाने संबंधित वसाहतीमध्ये जाऊन घराघरांना भेटी दिल्या. यात बाधित रुग्णांच्या कुटुंबासह मित्र, शेजारी, उपचार करणारे डॉक्टर असे १४ संशयितांना मेयोत दाखल केले. यात डॉक्टरसह १० संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. रात्री उशिरापर्यंत आणखी १२वर नमुन्यांची भर पडल्याचे समजते. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या ४२ वर्षीय पुरुषाचे नमुने गुरुवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबाचे व त्यांच्या दुकानात व्यवस्थापकाचे काम करणाऱ्या व्यक्तीचे नमुने घेऊन तपासण्यात आले. याचा अहवाल शुक्रवारी पहाटे आला. यात बाधित रुग्णाची आई, पत्नी, मुलगा व व्यवस्थापकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. यामुळे महानगरपालिका सतर्क झाली. रुग्णांकडून संपर्कात आलेल्याची माहिती घेण्यात आली. सुत्रानुसार, यात व्यवस्थापकाच्या घरातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. या शिवाय, दुकानातील काही कर्मचारी, शेजारी व मित्र असे एकूण सुमारे १४ लोकांना मेयोच्या वॉर्ड क्र.४ मध्ये दाखल केले. त्यांचे नमुने घेऊन मेयोच्याच प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यात दुकानात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांपैकी दोघांचे नमुन्यासह इतर सात संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. उर्वरीत चार व रात्री उशिरापर्यंत आणखी काही नमुन्यांची भर पडली. याचा अहवाल शनिवारी सकाळी येण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेच्यावतीने बाधित कुटुंबाचे घर सील केले आहे. या शिवाय, परिसरात मनपाने फवारणी करून आवश्यक उपाययोजना केल्यात - डॉक्टरही धोक्यात आले होते. पॉझिटिव्ह येण्यापूर्वी संबंधित रुग्णाने सर्दी, खोकला व तापासाठी एका खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला. गुरुवारी संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे कळताच डॉक्टरांनी मेयो गाठून नमुने दिले. डॉक्टरांना हलका खोकला व सर्दीची लक्षणे असल्याने तेही धोक्यात आले होते. परंतु नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.मेडिकलमध्ये १८ संशयित रुग्णमेडिकलमध्ये वॉर्ड क्र. २५ मध्ये कोरोना विषाणू संशयित १६ रुग्ण दाखल करण्यात आले. यात १३ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. तर इतर वॉर्डात दोन संशयित रुग्ण भरती आहेत. असे एकूण १८ रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. यांच्या नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत होता. एम्समधील एक डॉक्टर संशयितअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील (एम्स) एक महिला डॉक्टरकोरोना संशयित असल्याची चर्चा सुरू आहे. याची गंभीर दखल एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी घेतली. त्यांनी खबरदारी म्हणून नमुने तपासण्याचा सूचना केल्या आहेत. नमुने निगेटिव्ह आल्यावरच त्यांना ‘एम्स’मध्ये प्रवेश दिला जाईल. डॉ. दत्ता यांनी कोरोनाविषयीच्या अफवा पसरवू नये, असे आवाहनही केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर