शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 19:50 IST

राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमार्चमध्ये २२२ : एप्रिलमध्ये आढळले २००५ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. ३१ मार्चपर्यंत बाधितांची संख्या दर दिवसाला १ ते २७ च्या दरम्यान होती. मात्र एप्रिल महिन्याच्या १ ते २ तारखेच्या दरम्यान रोजच्या रुग्णांत वाढ होऊन ती १०० वर गेली. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.आरोग्य विभागाने दर दिवसाला नोंद होणाऱ्या ‘कोविड-१९’ रुग्णांची आकडेवारी उपलब्ध करून दिली असता, वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ९ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान नोंद झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले. यात रोजच्या रुग्णात होत असलेल्या धक्कादायक वाढीचे वास्तव समोर आले आहे. राज्यात पहिल्या तीन कोरोनाबाधितांची नोंद ९ मार्च रोजी झाली. त्यानंतर ११ मार्च रोजी ११ रुग्ण आढळून आले. १३ मार्च रोजीही एवढ्याच रुग्णांची नोंद होती. १५ मार्च रोजी रुग्णसंख्या कमी होऊन ती पाचवर आली. १७ मार्च रोजी आणखी रुग्णसंख्या घसरून दोनवर आली. १९ मार्चपर्यंत रोज दोन ते तीन रुग्ण आढळून येत होते. २१ मार्च रोजी यात वाढ झाली. त्या दिवशी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २३ मार्च रोजी रुग्णसंख्या दुपटीने वाढत २३ वर पोहचली. २५ मार्च रोजी रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी होऊन दोनवर आली. २७ मार्च रोजी रुग्णात पुन्हा वाढ झाली. २९ मार्च रोजी २२ रुग्ण तर मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी १७ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा प्रभाव एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिसून येऊ लागला. महिन्याच्या पहिल्याच दिवशी १०० रुग्ण पॉझिटिव्ह आले. ४ एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची रोजची संख्या शंभराच्या आत होती. ५ एप्रिल रोजी रुग्णाची संख्या वाढून ती १४८ वर पोहचली. ९ एप्रिलपर्यंत रोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या १५० होती. ११ एप्रिल रोजी मात्र यात वाढ झाली. या दिवशी २२९ रुग्ण आढळून आले.१२ एप्रिल रोजी रोजच्या रुग्णात किंचित घट होऊन ही संख्या १८७ वर पोहचली. परंतु १३ एप्रिल रोजी रोजच्या संख्येत दुपटीने वाढ होऊन एकाच दिवशी ३४४ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात रुग्णाची संख्या २२० होती, तर एप्रिल महिन्यात १३ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या २,१०५ झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा आहे. यावर प्रतिबंध घालायचा असेल तर शासनाच्या सूचनांचे पालन करणे हा एकच उपाय आहे. विशेष म्हणजे, घरीच थांबणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास स्वत:हून रुग्णालयात जाणे, आजार न लपविणे, हे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस