शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

CoronaVirus: सावधान! कोरोनानंतर रक्त गाेठणे हे तरुणांतील हृदयघाताचे माेठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 04:59 IST

Post corona side effects: डाॅ. जसपाल अर्नेजा : काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृदयघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिनाभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांतही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना आणि त्यातून बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टीव्हायरल औषध आहे, जे गृहविलगीकरणातील रुग्णांना दिले जाते. हा प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषध देण्याची गरज नाही. एम्सने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. ही चमत्कार घडविणारी किंवा सिद्धता असलेली औषधी नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. दुसरे औषध म्हणजे स्टेराॅईड. पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराॅईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२ च्या खाली घसरला आहे. या औषधामुळे रुग्ण बचावाचा दर वाढला आहे. स्टेराॅईडमुळे साईड इफेक्ट हाेतात, पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराॅईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचेही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळविणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचे ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. ते वाढले असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळविणारी ही औषधी दिली जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?साेशल मीडिया व वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?दुसरी लाटेच्या प्रभावाचे आकलन करण्यात कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढी वाढेल, याची अपेक्षा नव्हती. ऑक्सिजनपुरवठा वाढवण्यास स्थानिक प्रशासन चांगले काम करीत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागविली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?सध्या देशात साडे तीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मे च्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाख जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे का?पुढल्या वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे माेहीम राबवावी लागेल.

चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढविण्याचे प्रकार का वाढले?अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट अटॅक येण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस