शहरात पुन्हा कोरोनाचा शून्य मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:25+5:302021-02-06T04:15:25+5:30
नागपूर : सात महिन्यानंतर पहिल्यांदाच २९ जानेवारी रोजी शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली असताना शुक्रवारी त्याची पुनरावृत्ती झाली. २८८ ...

शहरात पुन्हा कोरोनाचा शून्य मृत्यूची नोंद
नागपूर : सात महिन्यानंतर पहिल्यांदाच २९ जानेवारी रोजी शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली असताना शुक्रवारी त्याची पुनरावृत्ती झाली. २८८ नव्या रुग्णांची भर पडली तर तीन रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १,३५,४७० झाली असून, मृतांची संख्या ४,१८५ वर पोहोचली. आज २०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली. आज ४२०५ चाचण्या झाल्या. यात ३५२७ आरटीपीसीआर, तर ६७९ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून २४२, अँटिजेनमधून ४६ बाधित रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरात शहरात २३३, ग्रामीणमध्ये ५३, तर जिल्हाबाहेरील दोन रुग्ण आहेत. मृतांमध्ये ग्रामीणमध्ये १, तर जिल्हाबाहेरील दोन मृत्यू आहेत. आतापर्यंत १,२८,०७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यांचे प्रमाण ९४.५४ टक्क्यांवर गेले आहे. ३२१३ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ८६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये, तर २३४९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-अनिल देशमुख कोरोनाबाधित
गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाल्याचे आज निदान झाले. त्यांनी स्वत: ट्वीट करून याची माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचण्या करण्याचे आवाहनही केले. देशमुख यांना आज थकल्यासारखे वाटले. डॉक्टरांनी तपासल्यावर दुपारी कोविड चाचणी केली. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती आहे.
-मेडिकलचा ट्रॉमा केअर सेंटर पुन्हा कोविड सेवेत
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मेडिकलमधील ट्रॉमा केअर सेंटरमधील रुग्ण नव्या अतिदक्षता विभागात स्थानांतरित करण्यात आले होते. परंतु भंडारा अग्निकांडाचे प्रकरण समोर येताच ‘फायर ऑडिट’चे निर्देश आले. यामुळे शुक्रवारपासून पुन्हा ट्रॉमा केअर सेंटर कोविड रुग्णसेवेत सुरू झाले.
-दैनिक संशयित : ४,२०६
-बाधित रुग्ण : १,३५,४७०
_-बरे झालेले : १,२८,०७२
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,१४६
- मृत्यू : ४,१७१