आमदार निवासात वाढले कोरोनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:39+5:302021-09-03T04:08:39+5:30

नागपूर : ‘डेल्टा प्लस’चे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एकतर कोविड हॉस्पिटलमध्ये ...

Corona's patient grew up in the MLA's residence | आमदार निवासात वाढले कोरोनाचे रुग्ण

आमदार निवासात वाढले कोरोनाचे रुग्ण

नागपूर : ‘डेल्टा प्लस’चे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एकतर कोविड हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. यामुळे आमदार निवासात रुग्ण वाढू लागले आहेत. तीन दिवसांत दहा रुग्णांची भर पडली. गुरुवारी शहरात ४, ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी १ असे एकूण ६ रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०४२ तर मृतांची संख्या १०,११९वर स्थिर आहे.

सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना नव्या निर्णयामुळे घरी विलगीकरणात राहता येणार नाही. तीन दिवसांपूर्वी आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नव्हता. परंतु आता रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. येथील बाधित रुग्णांना दहा दिवस ठेवून शेवटच्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यावरच सुटी देण्यात येईल. त्यानंतर पुढील सात दिवस रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. या अटीमुळे कोरोना चाचणी कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी ४,८२६ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.१ टक्का होता. आज ८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४,८२,८७९ वर पोहोचली आहे.

-होम आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण नाही

नागपूर जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत कोरोनाचे ४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ३९ रुग्ण शहरातील तर पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच होम आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण नाही. बाधित रुग्ण एकतर शासकीयसह खासगी हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये आहेत.

:: कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४८२६

शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण : ४,९३,०४२

ए. सक्रिय रुग्ण : ४४

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,८७९

ए. मृत्यू : १०११९

Web Title: Corona's patient grew up in the MLA's residence